For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नेहाच्या मारेकऱ्याला फाशी द्या

06:01 AM Apr 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
नेहाच्या मारेकऱ्याला फाशी द्या
Advertisement

श्रीराम सेना हिंदुस्थानतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

हुबळी येथील काँग्रेस नगरसेवक निरंजन हिरेमठ यांच्या कन्येची महाविद्यालयांमध्ये निर्घृण हत्या करण्यात आली आहे. अत्यंत घृणास्पद घटना असून या घटनेतील मारेकऱ्याला फाशी द्या, अशी मागणी श्रीराम सेना हिंदुस्थानतर्फे करण्यात आली. चन्नम्मा चौकात आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

Advertisement

या घटनेमुळे संपूर्ण हिंदू समाजातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. हुबळी येथील घटना अत्यंत अमानवीय आहे. यामुळे संपूर्ण हिंदू समाजावर अन्याय झाला आहे. अशा घटना पुन्हा होवू नयेत, यासाठी संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी. त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी करत श्रीराम सेना हिंदुस्थानतर्फे या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.

महिलांना सुरक्षा मिळत नसल्याने त्या भयभीत होत आहेत. अशा घटना त्याला कारणीभूत असून यामुळे महिलांच्या जीवनावर परिणाम होत आहे. यासाठी कठोर कायदे अंमलात आणावेत, अशी मागणी करण्यात आली. या घटनेचा सरकारने गांभीर्याने विचार करावा. सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी रमाकांत कोंडुस्कर, चंद्रकांत कोंडुस्कर, सतीश पाटील आदी कार्यकर्ते, महिला मोठ्यासंख्येने उपस्थित हेते

Advertisement
Tags :

.