महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विभागीय स्पर्धेत हंदिगनूरचे यश

10:37 AM Aug 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अगसगे : जिल्हा पंचायत व सार्वजनिक शिक्षण खाते, बेळगाव ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने कडोली विभागीय क्रीडा स्पर्धेत सरस्वती स्कूल हंदिगनूरच्या विद्यार्थ्यांनी मोठे यश संपादन केले. मुलांच्या विभागात बुद्धिबळमध्ये सुदर्शन तवनोजी अजिंक्य, तिहेरी उडी तृतिय, सिद्धार्थ पाटील योगामध्ये अजिंक्य, सुमित सुतार 55 किलो गटात प्रथम, यश पाटील 45 किलो गटात द्वितीय, आर्यन पाटील 55 किलोगटात द्वितीय, हॅमर थ्रो द्वितीय, विनायक पाटील गोळाफेक तृतिय, रोहीत तवनोजी, हॅमर थ्रो प्रथम, प्रफुल्ल कोकितकर-वॉकिंग प्रथम, विश्वनाथ अलगोंडी 100 मी. तृतिय, लखन हुंदरे थळीफेक व लांबउडीमध्ये द्वितीय, जयम पाटील तिहेरी उडीमध्ये प्रथम क्रमांक मिळविला. मुलींच्या विभागात साक्षी तवनोजी बुद्धिबळमध्ये अजिंक्य, साधना सनदी 3000 मी. तृतिय, प्रज्ञा कुंदरनूरकर वॉकिंक तृतिय, समृध्दी सुतार हॅडेल तृतिय, सानिका इंचनाळकर 100 मी. व 200 मी. तृतिय, अंकिता भांदुर्गे तिहेरी उडीमध्ये द्वितीय, मनीषा पाटील उंचउडी प्रथम क्रमांक मिळविला. सांघिक स्पर्धेत मुलांच्या थ्रोबॉल संघ विजेता, कब्बडीमध्ये उपविजेता तर मुलींच्या कबड्डी संघाने विजयी सलामी दिली. शाळेचे मुख्याध्यापक जी. एस. पाटील, क्रीडा शिक्षक एस. एल. मासेकर यांच्यासह शिक्षकांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article