महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

48 तासांसाठी ईडी, सीबीआय सोपवा, मग बघा

05:58 AM Nov 23, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

काँग्रेस नेते पवन खेडा यांचे पंतप्रधान मोदींना आव्हान

Advertisement

काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेडा यांनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले आहे. 7 दिवस नव्हे तर केवळ 48 तास ईडी आणि सीबीआयला आमच्या हाती सोपवा, पंतप्रधानांना सर्व रंग आठवू लागतील असे खेडा यांनी म्हटले आहे. भाजपकडून उपस्थित केल्या जाणाऱ्या लाल डायरीच्या मुद्द्यावर खेडा यांनी प्रत्युत्तर दिले आहे. कुठल्या डायरीत काय लिहिले आहे हे आम्हाला चांगल्याप्रकारे माहित आहे. केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि गजेंद्र शेखावत यांचा उल्लेख कुठल्या डायरीत आहे हे देखील पहा असे खेडा यांनी भाजपला सुनावले आहे.

Advertisement

ईडी आणि सीबीआयचे नियंत्रण आमच्या हातात द्या, मग कुठली डायरी लाल, निळी आणि पिवळ्या रंगाची आहे हे आम्ही सांगू. भाजप वारंवार कन्हैयालाल हत्या प्रकरण उपस्थित करत आहे. परंतु कन्हैयालालचे मारेकरी रियाज अत्तारी आणि गौस मोहम्मद हे भाजपचे पोलिंग बूथ एजंट होते की नाही याचे उत्तर भाजपच्या नेत्यांनी द्यावे असे काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांनी म्हटले आहे.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article