For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोल्हापुरातल्या हुपरी येथील अनधिकृत मदरशावर हातोडा

01:04 PM Jan 11, 2025 IST | Pooja Marathe
कोल्हापुरातल्या हुपरी येथील अनधिकृत मदरशावर हातोडा
Advertisement

कोल्हापूर
हुपरी येथील यशवंतनगर परिसरातील वादग्रस्त मदरसाचे अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला आज सकाळपासून सुरुवात करण्यात आली.  जमिनीचा मालकी हक्क शाबूत करणारा पुरावा व बांधकाम परवाना आदी कागदपत्रे मुस्लिम सुन्नत जमियतने नगरपरिषद प्रशसानाला सादर न केल्याने प्रशासनाने या अनधिकृत मदरसाचे अतिक्रमण काढायला सुरुवात केली आहे. या कारवाई दरम्यान तब्बल ४०० पोलिसांचा बंदोबस्त होता.

Advertisement

या कारवाई दरम्यान मुस्लिम बांधवांनी काही काळ मूक निदर्शने केली. यावेळी मुस्लिम बांधवांनी हातात छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा हातात घेवून ही मूक निदर्शने केली. या कारवाई दरम्यान हुपरी शहरात जागोजागी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
हिंदुत्ववादी संघटनांकडून मागील काही दिवसांपासून अतिक्रमण हटविण्याची मागणी करण्यात आली होती.
शहरातील सरकार गायरान भूमी गट क्रमांक ८४४/अ/१ पैकी मालमत्ता क्रमांक ४४८९ या मिळकतीवर मुस्लिम सुन्नत जमियतने बेकायदेशीर रित्या मदरसा उभारला होता. या जमिनीच्या मालकी हक्काबाबतची कागदपत्रे, बांधकाम परवाना व इतर संबंधित कागदपत्रे सादर करण्यासाठी हुपरी नगरपरिषदेने मुस्लिम सुन्नत जमियत ला नोटीस बजावली होती. मात्र मुस्लिम सुन्नत जामियतने शेवटपर्यंत कागदपत्रांचा पुरावा सादर केला नाही.
शासकिय कागदपत्रातून व आत्तापर्यंतच्या न्यायलयीन लढाईतून सरकारी गायरानावरती बेकायदेशीररित्या मदरसाचे बांधकाम केल्याचे सिद्ध झाले आहे. त्यानंतर प्रशासनाने शनिवारी हा वादग्रस्त मदरसा हटविण्याच्या कार्यवाहीला सुरुवात केली आहे.
या कारवाई दरम्यान अप्पर पोलिस अधिक्षक निकेश खाटमोडे पाटील, पोलिस उपअधिक्षक समीरसिंह साळवे, प्रांताधिकारी मौसमी बर्डे- चौगुले, अप्पर तहसिलदार सुनिल शेरखाने, मुख्याधिकारी अजय नरळे, पोलिस निरीक्षक एन आर चौखंडे आदी अधिकारी उपस्थित होते. यांच्यासह पोलिस बंदोबस्तही होता.

Advertisement
Advertisement
Tags :

.