महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हमास लष्करप्रमुखही हल्ल्यात ठार

07:00 AM Aug 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आता केवळ याह्या सिनवार हाच मोठा नेता शिल्लक

Advertisement

वृत्तसंस्था /जेरुसलेम

Advertisement

हमासचा राजकीय प्रमुख इस्माईल हानिया याची हत्या होऊन चोवीस तास उलटण्याच्या आत इस्रायलने या संघटनेचा लष्करप्रमुख मोहम्मद दाईफ यालाही कंठस्नान घातले आहे. दाईफ हा 2002 पासून या संघटनेच्या लष्करप्रमुखपदी होता. 7 ऑक्टोबर 2023 या दिवशी इस्रायलवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा तोही एक सूत्रधार होता, अशी माहिती देण्यात आली आहे. अद्याप हमासने त्याच्या मृत्यूला दुजोरा दिलेला नाही. मात्र, इस्रायलच्या हल्ल्यातून तो वाचलेला नाही, असे अमेरिकेकडूनही स्पष्ट करण्यात आले आहे. हमास संघटनेत तो इस्लाईल हानिया नंतर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा नेता होता. त्याच्या मृत्यूमुळे आता या संघटनेकडे याह्या सिनवार हा एकच मोठा म्होरक्या उरला आहे. तो सध्या इस्रायलशी होत असलेल्या हमासच्या युद्धात गुंतला आहे. दाईफ हा इस्रायलला अनेक वर्षांपासून ताब्यात हवा होता.

13 जुलैचा हल्ला

13 जुलै 2024 या दिवशी इस्रायलने गाझा पट्टीतील अल् मवासी छावणीवर हल्ला चढविण्यात आला होता. या हल्ल्यात 90 लोकांचा मृत्यू झाला होता असे हमासचे म्हणणे आहे. या छावणीत दाईफ याचे वास्तव्य होते. तो या हल्ल्यात मारला गेला अशी चर्चा तेव्हाही होती. इस्रायलने यापूर्वी त्याला सात वेळा ठार करण्यासाठी प्रयत्न केला होता. तथापि तो सुदैवाने बचावला होता.

विज्ञानाचा विद्यार्थी

मोहम्मद दाईफ हा विज्ञान शाखेचा पदवीधर होता, अशी माहिती उपलब्ध आहे. त्याची ओळख ‘अभेद्य नेता’ अशी होती. अनेकदा हल्ल्यातून तो वाचला असल्याने त्याला अशी ओळख मिळाली होती. हमास या संघटनेशी त्याचे गेल्या 24 वर्षांपासूनचे संबंध आहेत. 2014 मध्ये इस्रायल आणि हमास यांच्यात उद्भवलेल्या मोठ्या संघर्षात त्याने हमासचे नेतृत्व केले होते. इस्रायलविरोधात आक्रमक रणनीती आखण्यात त्याचा महत्वाचा वाटा असल्याची चर्चा आहे. हानिया याच्या समवेत त्याने 7 ऑक्टोबरच्या हल्ल्याची योजना तयार केली होती, अशी चर्चा आहे. या हल्ल्यामुळेच शांततेच्या मार्गावर जात असलेल्या मध्यपूर्वेतील परिस्थिती पुन्हा बिघडली असून इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध भडकले आहे.

अनेक दहशतवादी हल्ले

दाईफ याच्या नावावर इस्रायलच्या विरोधात अनेक दहशतवादी हल्ले आहेत. 1996 मध्ये ओस्लो समझोत्याच्या विरोधात त्याने इस्रायलमध्ये केलेल्या दहशतवादी हल्ल्यात 50 इस्रायली नागरीक मारले गेले होते. 1985 पासून तो हमासच्या लष्करपमुखपदी आहे. त्याच्या मृत्यूने हमासची मोठी हानी झाल्याचे मानण्यात येते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article