महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हलशीवाडी नागझरी तलावास जलपर्णीचा विळखा

10:43 AM Nov 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वर्षभरापासून तलावात विषारी जलपर्णीचा विळखा : तातडीने  जलपर्णी काढण्याची मागणी

Advertisement

वार्ताहर/हलशी

Advertisement

हलशीवाडी ता. खानापूर येथील गावच्या पश्चिमेला असणाऱ्या नागझरी तलावास विषारी जलपर्णीचा वेळखा पडला आहे. गेल्या वर्षभरापासून तलावात जलपर्णीला सुरुवात झाली होती. त्या काळात ग्राम पंचायतीने त्याकडे दुर्लक्ष केल्याने संपूर्ण तलावालाच या जलपर्णीने वेढले आहे. परिणामी जनमाणसावर तसेच पाळीव जनावरांना याचा धोका पोहोचण्याची शक्यता असल्याने तातडीने ही जलपर्णी काढणे गरजेची असल्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे. हलशीवाडीला लागूनच हा विस्तीर्ण तलाव असून याला बारमाही पाणी असते. ऐन उन्हाळ्यात या तलावाचा उपयोग हलशीवाडी व हलशी गावातील नागरिकांना होतो. जनावरांना पाणी पाजण्यापासून कपडे धुणे आदी जीवनोपयोगी कामासाठी या तलावाचा उपयोग केला जातो. गेल्या आठ वर्षापूर्वी या तलावाचे लाखो रुपये खर्च करून खोदाई करून करण्यात आली आहे. यामुळे शेकडो एकर जमीन या तलावाच्या ओलिताखाली पिकत आहे. ग्रा. पं. सदस्यांच्या डोळ्यादेखत जलपर्णीची वेल तलावात पडत असली तरी ती काढण्याची तजबीज अद्याप तरी केली नाही. यामुळे ग्रामस्थांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. येथील घोटण तलावाला देखील सात वर्षांपूर्वी असाच जलपर्णीचा विळखा पडला होता.

जलपर्णीचा माणसांसह जनावरांना धोका

या तलावात मध्यंतरी काहींनी मत्स्यपालन व्यवसाय केला होता. या तलावात नेहमी नागरिकांचा व पाळीव जनावरांचा वावर असतो. मात्र तलावाला जलपर्णीने वेढले असल्याने पाण्यात शिरलेल्या जनावरांना याचा धोका होण्याचा संभव निर्माण झाला आहे. ही जलपर्णी काटेरी असून माणसाला किंवा जनावरास याचे काटे टोचतात. त्यामुळे हिवताप होण्याचा संभव असतो. सध्या ही जलपर्णी कोळी असल्याने अद्याप काटेरीपणा आला नसल्याने ती बाहेर काढण्यास सोपे जाणार आहे. अन्यथा कालांतराने याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article