महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

देसूर येथील घरफोडीप्रकरणी हलशी येथील तरुणाला अटक

06:20 AM Aug 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

6 लाखांचा ऐवज जप्त, कोल्हापुरातही चोऱ्या केल्याची कबुली

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

देसूर (ता. बेळगाव) येथे झालेल्या घरफोडी प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी हलशी, ता. खानापूर येथील एका तरुणाला अटक केली आहे. त्याच्याजवळून सुमारे 6 लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या तरुणाने कोल्हापुरातही चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे.

महादेव नारायण धामणेकर (वय 27) रा. हलशी असे त्याचे नाव आहे. बुधवार दि. 14 ऑगस्ट रोजी त्याला अटक करण्यात आली आहे. बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ, उपनिरीक्षक लक्काप्पा जोडट्टी, उपनिरीक्षक आदित्य राजन व एस. एस. निडवनी, व्ही. एन. कंटीकर, एस. बी. उप्पार, बी. एस. पडनाड, एम. एम. नाईक, एस. एम. हंचिनमनी, एस. एम. लोकुरे, एस. एस. पच्चन्नावर, सी. एस. सिंगारी आदींचा समावेश असलेल्या पथकाने ही कारवाई केली आहे.

गेल्या रविवार दि. 11 ऑगस्ट रोजी देसूर येथे चोरीची घटना घडली होती. यासंबंधी मंगळवार दि. 13 ऑगस्ट रोजी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात भारतीय न्यायसंहिता 331 (3), 305 कलमान्वये एफआयआर दाखल करण्यात आला होता. नारायण कळसेकर यांच्या घरी चोरी झाली होती.

पोलिसांनी महादेव धामणेकर या तरुणाला अटक करून त्याच्याजवळून 91 ग्रॅम सोने, 400 ग्रॅम चांदी असा एकूण 6 लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त केला आहे. महादेवने देसूर व कोल्हापूर येथे चोरी केल्याची कबुली दिली आहे. महादेवला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असून त्याची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article