महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

29 सप्टेंबर रोजी हाफ मॅरेथॉन स्पर्धा

10:10 AM Sep 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

खानापूर : खानापूर येथे इलाईट रनिंग अॅकॅडमी आयोजित 29 सप्टेंबर रोजी 10 कि. मी. हाफ मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. खानापूर 10 किमी रनची चौथी आवृत्ती 29 सप्टेंबर  रोजी ‘रन फॉर नेचर‘ या थीमसह आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत जगदीश शिंदे, गुरुप्रसाद देसाई, कपिल गुरव, अरुण होसमणी यांनी दिली. या स्पर्धेत भारतातून 600 हून अधिक धावपटू सहभागी होत आहेत. सर्व वयोगटातील धावपटू आणि काही ज्येष्ठ धावपट्टू यात सहभागी होत आहेत. 74 वर्षीय धावपटू शिवकुमार वागळे 10 किलोमीटर धावणार आहेत.

Advertisement

ही स्पर्धा येथील नागन्ना होसमणी कान्व्हेशन हॉल येथून सकाळी 6.30 वाजता सुरु होणार आहे. ही स्पर्धा 10 कि. मी. 5 कि. मी, 3 कि.मी. अशा 3 श्रेणीत घेण्यात येणार आहे.  सर्व धावपटूंना वेळ तपासण्यासाठी मायक्रो चिप बसवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक स्पर्धकाचे वेळ समजणार आहे. शर्यतीचा मार्ग निसर्गरम्य खानापूर-पारिश्वाड रस्त्याने आहे.  ही स्पर्धा नागरिकामध्ये आरोग्याबाबत जागृतता निर्माण व्हावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आली आहे. विविध वयोगटातील विजेत्यांना 1.25 लाख. रु. ची आकर्षक रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. सर्व धावपटूंना पदके, शर्यतीनंतर अल्पोपाहार, टीशर्ट आणि ई-टाइमिंग प्रमाणपत्र दिले जाईल.  अधिक माहितीसाठी  संघटनेशी संपर्क साधावा.असून या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकानी भाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दसरा क्रीडा स्पर्धेतील थ्रो बॉल मध्ये बेळगाव वॉरियर्स संघ विजेता.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article