For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अगरवाल, समरन यांची अर्धशतके

06:22 AM Nov 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
अगरवाल  समरन यांची अर्धशतके
Advertisement

वृत्तसंस्था / पुणे

Advertisement

रणजी क्रिकेट स्पर्धेतील येथे शनिवारपासून सुरू झालेल्या इलाईट ब गटातील सामन्यात कर्णधार मयांक अगरवाल आणि रविचंद्रन समरन यांच्या अर्धशतकाच्या जोरावर कर्नाटकाने पहिल्या डावात महाराष्ट्र विरुद्ध 5 बाद 257 धावा जमविल्या.

या सामन्यात कर्नाटकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अगरवाल आणि अनिष या सलामीच्या जोडीने 66 धावांची भागिदारी केली. अनिषने 1 षटकार आणि 4 चौकारांसह 34 धावा जमविल्या. अनिष बाद झाल्यानंतर कर्नाटकाचे दोन फलंदाज लवकर तंबूत परतले. श्रीजित 10 धावांवर तर करूण नायर 4 धावांवर बाद झाले. कर्नाटकाची यावेळी स्थिती 3 बाद 89 अशी केविलवाणी होती. कर्णधार अगरवाल आणि समरन यांनी संघाचा डाव सावरताना चौथ्या गड्यासाठी 99 धावांची भागिदारी केली. समरनने 7 चौकारांसह 54 धावा जमविल्या. अगरवालने 181 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकारांसह 80 धावा झळकविल्या. दिवसअखेर अभिनव मनोहर 2 षटकारांसह 31 तर श्रेयस गोपाल 3 चौकारांसह 32 धावांवर खेळत असून या जोडीने सहाव्या गड्यासाठी अभेद्य 63 धावांची भागिदारी केली. महाराष्ट्रातर्फे सक्सेनाने 80 धावांत 3 तर ओसवाल आणि घोष यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला.

Advertisement

संक्षिप्त धावफलक: कर्नाटक प. डाव 89 षटकात 5 बाद 257 (अगरवाल 80, समरन 54, मनोहर खेळत आहे 31, गोपाल खेळत आहे 32, अनिष 34, सक्सेना 3-80).

Advertisement
Tags :

.