काही घडलं तर अर्ध मंत्रीमंडळ एका बाजूला आणि अर्ध एका बाजूला -सतेज पाटील
पी. एन. पाटील कोल्हापूर काँग्रेसचे आधारस्तंभ होतेः काँग्रेस आमदार सतेज पाटील
पी. एन. पाटील जयंती अभिवादन
आज त्यांची जयंती असल्याने त्यांच्या स्मृतीला आम्ही आज एकत्र येऊन उजाळा देत आहोत
कोल्हापूर
कॉंग्रेसचे माजी आमदार पी. एन. पाटील यांच्या जयंतीदिनी, त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. यावेळी बोलताना कॉंग्रेसचे आमदार सतेज पाटील म्हणाले, पी. एन. पाटील हे कोल्हापूर कॉंग्रेसचे आधारस्तंभ होते. महाराष्ट्रातले दिग्गज नेते होते. त्यांच्य जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आम्ही कॉंग्रेसचे सर्व कार्यकर्ते एकत्र आलो आहोत. कॉंग्रेसमध्ये एकनिष्ठता काय असते. हा आदर्श पी. एन. पाटील यांनी दिला.
यावेळी बीड प्रकरणावर बोलताना आमदार पाटील म्हणाले, सरकार यामध्ये आता खेळखंडोबा करतेय का असे वाटते. सत्ताधारी पक्षामधील सुरेश धस सातत्याने भूमिका मांडत आहेत. तर राष्ट्रवादीची भूमिका काय आहे हे स्पष्ट होत नाही. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होतोय का असं महाराष्ट्राच्या जनतेला वाटत आहे. सत्ता कोणाची यापेक्षा महाराष्ट्रातील पोलिसांची प्रतिष्ठा या प्रकरणात पणाला लागली आहे. सरपंचाला मारलेल्या मारेकऱ्यांना अटक करू शकत नाही हे पोलिसांसाठी दुर्दैवी आहे. पोलिसांनी राजकीय दबाव बाजूला ठेवून योग्य ती कारवाई करावी. एकाने एक बाजू आणि दुसऱ्यांनी एक बाजू घ्यायची असे सुरू आहे. काही घडले तर अर्ध मंत्रिमंडळ एका बाजूला आणि अर्धे मंत्रिमंडळ दुसऱ्या बाजूला. या प्रकरणातसुद्धा 'चित भी मेरी पट भी मेरा..' असेच सुरू आहे. सत्ताधारी पक्षातीलच लोक न्याय मागण्यासाठी आहेत आणि अन्याय काय होतो हे सांगण्यासाठी पण हेच लोक आहेत. आम्हाला कळत नाही महायुती म्हणून ते एकत्र आहेत की वेगवेगळे पक्ष म्हणून .
जिल्ह्याच्या पालकमंत्री निवडीबद्दल बोलताना म्हणाले, झेंडावंदन पुरते पालकमंत्री नसतात... जिल्ह्यातील अनेक कामे रखडलेली आहेत.
यावेळी चीनमधून पसरत असलेला HMPV व्हायरसच्या संसर्गाबद्दल बोलताना म्हणाले, याबाबत सर्वांनी काळजी घ्यायला हवी. या व्हायरसचा प्रसार होऊ नये यासाठी राज्य सरकारकडून अपेक्षा आहेत.