For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

न्हाऊ-माखू घालणारे यंत्र

06:53 AM Dec 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
न्हाऊ माखू घालणारे यंत्र
Advertisement

कपडे धुण्याचे यंत्र किंवा बशा आणि भांडी धुण्याचे यंत्र अलिकडच्या काळात सर्वपरिचित आहे. तथापि, अशाच प्रकारे माणसे धुवून काढण्याचे यंत्र निर्माण करण्यात आले आहे, हे वृत्त आपल्यापैकी कित्येकांसाठी धक्कादायक असू शकते. श्रीमंतांच्या स्नानकक्षात किंवा महागड्या हॉटेलांच्या न्हाणीघरांमध्ये अशा प्रकारची टबबाथ घेण्याची व्यवस्था असते, हे बऱ्याच जणांना माहीत असते किंवा काहींनी अनुभवलेलेही असू शकते. पण हे यंत्र या व्यवस्थांपेक्षा भिन्न आहे.

Advertisement

1970 मध्ये जपानच्या पॅनासोनिक कंपनीने कपडे धुण्याचे यंत्र बाजारात आणले होते. ते प्रथम फारसे लोकप्रिय झाले नव्हते कारण त्यात बऱ्याच त्रुटी होत्या. नंतर या यंत्रात मोठी सुधारणा करण्यात आली आणि आज जगात एकही मध्यवर्गीय किंवा श्रीमंत घर असे दिसत नाही, की ज्यात वस्त्रप्रक्षालन यंत्र किंवा वॉशिंग मशिन दिसत नाही. आता याच जपान देशाने माणसे धुण्याचे यंत्रही बाजारात प्रथम आणण्याचा मान मिळविला आहे. या यंत्राचे नाव ‘मिराई निन्जेन सेंटाकुटी’ असे लांबलचक आहे. या यंत्राची सर्व परीक्षणे यशस्वी झाली असून ते मानवाच्या उपयोगाला अत्यंत योग्य आहे, असे स्पष्ट झाले आहे. हे यंत्र सध्या मर्यादित प्रमाणात बाजारात आणण्यात आले आहे. पण 2025 मध्ये याचे रीतसर औपचारिक लाँचिंग करण्यात येणार असून ते मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल.

स्नान करण्यासाठी हे यंत्र परिपूर्ण आहे असे प्रतिपादन करण्यात आले आहे. या यंत्रात साबण आणि पाण्याच्या साहाय्याने सूक्ष्म अल्ट्रासाऊंड बुडबुडे निर्माण केले जातात. या यंत्राचा आकार बाथटबसारखच आहे. आपण केवळ या यंत्रात पडून रहायचे असते. इतर सर्व काम हे यंत्रच करते. अल्ट्रासाऊंड बुडबुड्यांच्यामुळे आपले शरीर कमी पाण्यातही व्यवस्थित स्वच्छ होते. या यंत्रातील सेन्सर्समुळे आपल्या नाडीचे ठोके आणि इतर जैविक माहितीही नोंद केली जाते. प्रथम अशी 1 हजार यंत्रे बाजारात आणली जाणार आहेत. नंतर लोकांचा प्रतिसाद पाहून उत्पादन वाढविले जाईल, अशी माहिती उत्पादन कंपनीकडून देण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.