केस, कपडे, घर सर्वकाही हिरवे
महिलेने स्वत:च्या प्रत्येक गोष्टीला दिला हिरवा रंग
न्यूयॉर्कच्या ब्रुकलिनच्या गल्ल्यांमध्ये एका महिलेचे केस चमकणाऱ्या हिरव्या रंगाचे दिसून येतील. तसेच कपडे, बूट आणि घरांच्या भिंतींनाही हिरवा रंग तिने दिला आहे. या ग्रीन लेडीचे नाव एलिझाबेथ स्वीटहार्ड असले तरीही पूर्ण जग तिला ‘द ग्रीन लेडी ऑफ ब्रुकलिन’ नावाने ओळखते. 1941 मध्ये कॅनडाच्या नोवा स्कोटियामध्ये जन्मलेली एलिझाबेथ बालपणासूनच रंगांच्या जगताशी जोडलेली राहिली आहे. तिच्यासाठी हिरवा रंगाची स्वत:ची एक एनर्जी होती, परंतु हिरवा रंग नेहमीच तिच्या मनात स्थान करून राहिला आहे.
तिच्या कलेत रंगांची बारकाई आणि जीवनाची झलक दिसून यायची. 1987 मध्ये एलिझाबेथने स्वत:चा स्टुडिओ सुरू केला आणि याला स्वीटपी डिझाइन स्टुडिओ नाव दिले. तेथे तिने 15 वर्षांपर्यंत काम केले आणि अनेक डिझाइनर्सना प्रेरित केले. परंतु त्यानंतर तिने एक मोठा निर्णय घेतला आता स्वत:चे पूर्ण जीवन हिरव्या रंगाच्या नावाने असेल,
हिरव्या रंगात एक जादू
हिरव्या रंगात एक जादू आहे. मी जेव्हा हिरव्या कपड्यांमध्ये बाहेर पडते, तेव्हा लोक हसू लागतात, लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आणणे हीच कला आहे. माझ्यासाठी हिरवा केवळ रंग नाही, तर एक जीवन दर्शन असल्याचे त्यांचे सांगणे आहे. कधीकधी वेगळे असणे हीच खरी कला आहे. लोक मला पाहून हैराण होतात, काही थट्टाही करतात, परंतु हेच जीवनाचे सौंदर्य आहे. स्वत:च्या रंगात कुठल्याही भीती अन् संकोचाशिवाय गुंतून जाणे हीच कला असल्याचे त्यांचे सांगणे आहे.