हैली स्टेनफेल्डची जोश एलनसोबत एंगेजमेंट
स्पायडरमॅन चित्रपटातील अभिनेत्री
अभिनेत्री हैली स्टेनफैल्ड आणि जोश एलन यांनी एंगेजमेंट केली आहे. अभिनेत्याने चाहत्यांना ही आनंदाची बातमी देत एक पोस्ट शेअर केली आहे. यातील फोटोत हैलीला गुडघ्यावर बसून जोशला प्रपोज करताना पाहिले जाऊ शकते. या पोस्टनंतर अनेक दिग्गजांनी दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत. टेनिसपटू सानिया मिर्झाचा देखील यात समावेश आहे. 2023 पासून हैली आणि जोश यांच्या रिलेशनशिपविषयी चर्चा सुरू होती. परस्परांना डेट केल्यावरही दोघांनीही स्वत:च्या नात्याबद्दल जाहिर वाच्यता करणे टाळले होते. स्टेनफील्डला ‘पिच परफेक्ट’ फिल्म सीरिज (2015-17) आणि द एज ऑफ सेवेंटीनमधील स्वत:च्या भूमिकांसाठी ओळखले जाते. त्याने एंडर्स गेम, बिगिन अगेन आणि बम्बलबी या चित्रपटांमध्येही अभियन केला आहे. तर यापूर्वी जोश ही ब्रिटनी विलियम्सला 10 वर्षांपासून डेट करत होता. परंतु 2023 च्या प्रारंभी हे जोडपे विभक्त झाले होते. ते दोघेही परस्परांना बालपणासून ओळखत होते.