महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

एच-1 बी व्हिसाच्या अटी झाल्या शिथील

06:43 AM Dec 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / वॉशिंग्टन

Advertisement

भारतीयांना अमेरिकेचा दरवाजा उघडून देण्यात महत्वाची भूमिका असणाऱ्या ‘एच-1 बी’ व्हिसाच्या अटी शिथील करण्याचा निर्णय अमेरिकेच्या जोसेफ बायडेन यांच्या प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयाचा सर्वाधिक लाभ भारतीय तंत्रज्ञ आणि उच्चशिक्षितांना होणार आहे. हा निर्णय घेऊन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ बायडेन यांच्या प्रशासनाने जाता जाता भारतासाठी एक समाधानकारक पाऊल उचलले आहे. येत्या 20 जानेवारीपासून अमेरिकेचे प्रशासन ट्रम्प यांच्या हाती जाणार आहे.

Advertisement

मंगळवारी अमेरिकेच्या होमलँड सिक्युरिटी विभागाने या निर्णयाची घोषणा केली. नव्या नियमांच्या अनुसार अमेरिकन कंपन्यांना विदेशातून तंत्रज्ञ आणि विविध क्षेत्रांमधील तज्ञांच्या अमेरिकेत नोकरी देण्यासाठी कमी कठोर अटींची पूर्तता करावी लागणार आहे. नियमांमध्ये शिथीलता आणण्यात आल्याने व्हिसा मिळविणे अधिक सुलभ होणार आहे. प्रतिवर्षी भारतातून अमेरिकेत या व्हिसावर 50 ते 60 हजार तंत्रज्ञांना आणि उच्चशिक्षितांना जाता येते. हा बिगर स्थलांतर व्हिसा आहे. याचा अर्थ असा की या व्हिसावर अमेरिकेत गेलेल्यांना स्थलांरित मानण्यात येत नाही. त्यांना अमेरिकेत मालमत्ता विकत घेता येते. तसेच नोकरी किंवा व्यवसायही करता येतो. तथापि, त्यांना त्वरित अमेरिकेचे नागरिकत्व मिळत नाही. भारताचे नागरिक राहूनही अमेरिकेत पैसा मिळविण्याची संधी या व्हिसामुळे उपलब्ध होते.

अमेरिकेचाही लाभ

या व्हिसा व्यवस्थेमुळे अमेरिकेच्या कंपन्यांनाही जगभरातील उच्चशिक्षितांच्या प्रतिभेचा लाभ घेता येतो. प्रत्येक वर्षी असे दोन लाखाच्या आसपास व्हिसा वितरीत केले जातात. या व्हिसावर अमेरिकेत काम करणाऱ्यांमध्ये भारतीयांची संख्या अन्य कोणत्याही देशाच्या तुलनेत सर्वाधिक असल्याची माहिती देण्यात आली आहे.

भारताशी सुदृढ संबंध

जोसेफ बायडेन यांच्या अध्यक्षतेच्या काळात भारताशी अमेरिकेचे संबंध अधिकच सुदृढ झाले आहेत. पुढच्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या काळातही या संबंधांना अधिकच बळ प्राप्त होईल, असा विश्वास बायडेन यांच्या प्रशासनाने व्यक्त केला आहे. हे प्रशासन पुढच्या महिन्यात निरोप घेणार आहे. भारत हा अमेरिकेचा विश्वासू भागीदार देश असून हे स्थान पुढेही राहील, अशी अपेक्षा आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article