जिमखाना, प्रमोद पालेकर अकादमी विजयी
शंतनू चषक क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : प्रमोद पालेकर क्रिकेट अकादमी आयोजित शंतनू फाउंडेशन चषक 11 वर्षाखालील आंतर क्लब क्रिकेट स्पर्धेत युनियन जिमखानाने आनंद अकादमीचा 8 गड्यांनी तर प्रमोद पालेकर बीएससीचा 7 धावांनी पराभव करून प्रत्येकी दोन गुण मिळवले. संचिता व सफनान नदाफ यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. व्हॅक्सिन डेपो मैदानावरील पहिल्या सामन्यात आनंद अकादमीने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 5 गडी बाद 146 धावा केल्या. त्यात आमदने 8 चौकारासह 68, विनोद शहापूरने तीन चौकारांसह 31, जिमखानातर्फे सचिता नाईकने 18 गावात 2, तर आदर्शने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना युनियन जिमखाना संघाने 18.2 षटकात दोन गडी बाद 147 धावा करून सामना 8 गड्यानी जिंकला त्यात सलमान धारवाडकरने 2 षटकार व 7 चौकारांसह 67, सचिता नाईकने सहा चौकारांसह 36 धावा केल्या. दुसऱ्या सामन्यात प्रमोद पालेकर क्रिकेट अकादमीने प्रथम फलंदाजी करताना 22 षटकात सर्व गडी बाद 147 धावा केल्या. त्यात प्रथम बल्लाळने सात चौकारासह 38 धावा केल्या. बीएससीतर्फे सुफनान नदाफने 11 धावात दोन, तर अर्जुनने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना बीएससीने 25 षटकात 4 गडी बाद 140 धावा केल्या. त्यात ध्रुवने 9 चौकारासह 69, तर अथर्वने दोन चौकारासह 27 धावा केल्या. प्रमोद पालेकरतर्फे चिन्मयने 23 धावात 3, झोयान व तऊण यांनी प्रत्येकी दोन गडी तर ध्रुवने 1 गडी बाद केला.