For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

६९ हजारांचा गुटखा जप्त : उमदी पोलिसांची कारवाई

06:55 PM Dec 08, 2023 IST | Kalyani Amanagi
६९ हजारांचा गुटखा जप्त   उमदी पोलिसांची कारवाई
Advertisement

गुटखा वाहतूक करणाऱ्या दोघांना मुद्देमालासह अटक

Advertisement

उमदी प्रतिनिधी

जत तालुक्यातील उटगी जाडरबोबलाद रस्त्यावरून मोटारसायकल वरून धनंजय तोयणाप्पा घोंगडे( वय ५२ राहणार येळवी ता.जत) व अहमंद सिराज मुलाणी( वय ४२ राहणार खैराव ता.जत) यांना मोटारसायकल वरून गुटखा व तंबाखू वाहतूक करताना उमदी पोलिसांनी पकडून त्यांच्यावर कारवाई केली.

Advertisement

अधिक माहिती अशी की, उमदी पोलिसांना गोपनीय खबऱ्या कडून दिनांक ५ डिसेंबर रोजी उटगी मार्गे जाडरबोबलाद कडे मोटारसायकल वरून गुटखा घेऊन दोन इसम जाणार असल्याचे खात्रीलायक माहिती मिळाली. त्यानुसार जिल्हा पोलिस अधीक्षक बसवराज तेली व डिवायएसपी सुनिल साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली उमदी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी सापळा रचत उटगी जाडरबोबलाद रस्त्यावरून जात असताना धनंजय तवण्णाप्पा घोंगडे व अहमंद सिराज मुलाणी यांना मोटारसायकल वरून गुटखा घेऊन जात असताना पकडून ३१ हजार २०० रुपयांची २६० पाकीटे विमल पान मसाला गुटखा व ७ हजार ८०० रुपयाची ५० पाकीटे सुगंधी टोबॅगो व बजाज कंपनीची मोटारसायकल असा एकूण ६९ हजार रुपयांच्या मुद्देमालासह दोन्ही संशयित आरोपींना रंगेहाथ पकडले.

ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक शिरिष शिंदे, पोलिस नामदेव काळेल, प्रशांत कोळी,आर.एस.बन्नेनवर, मनिष कुमरे, अमित चौगुले, सिद्धेश्वर आटपाडकर, सोपान भंडे, नितीन खोंडे, सुदर्शन खोत यांनी केली. संशयित आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २ दिवस पोलिस कोठडी दिली असून अधिक तपास उमदी पोलिस करत आहेत.

Advertisement
Tags :

.