For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निवळीत कारसह 15 लाखांचा गुटखा जप्त! तिघांविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

03:33 PM Jul 12, 2024 IST | Abhijeet Khandekar
निवळीत कारसह 15 लाखांचा गुटखा जप्त  तिघांविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Advertisement

पतिनिधी रत्नागिरी 

Advertisement

तालुक्यातील निवळी येथे गुटख्याची चोरटी वाहतूक करणाऱया वाहनावर अन्न व औषध प्रशासनाने पोलिसांच्या सहकार्याने गावारी कारवाई केली. या कारवाईत कारसह 15 लाख 20 हजार 116 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. यापकरणी तिघा संशयिताविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल बलवंत घोरपडे (32, रा. मिरज खटाव, जि. सांगली), संकेत शिवाजी चव्हाण (फणसोप), सुरज राजु साळुंखे (पुणे) अशी संशयिताची नावे आहे. हे तिघेही सध्या फणसोप-रत्नागिरी येथे वास्तव्यास होते.

जिह्यात हानीकारक गुटखा विक्री होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांसह अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांची मदत घेऊन प्रशासनाने ही कारवाई केली. कोकण विभागाचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त म. ना. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली व रत्नागिरी कार्यालय सहायक आयुक्त दिनानाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार अन्न सुरक्षाचे अधिकारी वि. जे. पाचपुते, गुन्हा अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस फौजदार आकाश साळुखे यांच्यासह टीमने निवळी येथे सकाळी 7.30 वाजता सापळा रचला होता. सकाळी साडेआठच्या सुमारास सांगलीहून श्रीक्षेत्र गणपतीपुळेकडे जाणाऱया कारची (क्र. एमएचö ऐपी 4545) तपासणी केली. वाहनामध्ये गुटखा, विमल पानमसाला, मिराज तंबाखू, सुगंधी तंबाखू, आरएमडी पानमसाला असा सुमारे 8 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल सापडला. वाहनासह पोलिसांनी 15 लाख 20 हजार 116 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या वाहनात सुरज राजू साळुंखे व वाहनचालक विशाल घोरपडे हे दोघे होते. घोरपडे हा वाहन चालवत होता. त्यांची चौकशी केली असता हानीकारक गुटखा घेऊन गणपतीपुळे येथे जात असल्याचे संशयित घोरपडे यांनी सांगितले. स्थानिक गुन्हा अन्वेषण पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले.

Advertisement

Advertisement
Tags :

.