महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘तारक मेहता...’मधील गुरुचरण परतला घरी

#TARUN
06:22 AM May 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

 आध्यात्मिक प्रवास केल्याचा दावा : अमृतसर-लुधियाना येथील गुरुद्वाराला भेट

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मधील अभिनेता गुरुचरण सिंग तीन आठवड्यांनंतर शुक्रवारी घरी परतला. 22 एप्रिलपासून तो बेपत्ता होता. दिल्ली पोलिसांकडून गुरुचरण सिंग याची चौकशी सुरू केली असून यामध्ये त्याने आपण आध्यात्मिक प्रवासावर गेल्याचे स्पष्ट केले. गेल्या तीन आठवड्यात आपण सांसारिक व्यवहार सोडून अमृतसर, लुधियानासह अनेक शहरांतील गुऊद्वारांना भेट दिल्याचे त्याने मान्य केले. आता घरी परतले पाहिजे याची जाणीव झाल्याने आपण आध्यात्मिक प्रवासावरून माघारी परतल्याचे त्याने सांगितले.

गुरुचरण सिंग 22 एप्रिल रोजी आपल्या दिल्लीतील घरातून मुंबईला रवाना झाला होता. त्याने विमानाचे तिकीटही बुक केले होते. मात्र, तो मुंबईत किंवा आपल्या निवासस्थानी न परतल्याने दिल्ली पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.

आर्थिक संकटाशी झुंज

गुऊचरण लवकरच लग्न करणार असल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले होते. तसेच तो आर्थिक संकटाशीही झगडत होता. गुरुचरणने 22 एप्रिल रोजी एटीएममधून 7,000 रुपये काढले होते, त्यानंतर त्यांचा फोन बंद होता. दिल्लीतील पालम येथील त्याच्या घरापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर त्याचे शेवटचे लोकेशन सापडले होते.

निर्मात्याशी वाद झाल्यानंतर शो सोडला

गुऊचरण सिंग ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या सुऊवातीपासून 2013 पर्यंत एक भाग होता. नंतर निर्माते असित मोदी यांच्याशी काही वाद झाल्याने त्यांनी शो सोडला. मात्र, तोपर्यंत तो इतका लोकप्रिय झाला होता की सार्वजनिक मागणीनुसार निर्मात्यांना त्याला शोमध्ये परत आणावे लागले. पुनरागमन केल्यानंतर त्याने हा शो 6 वर्षे केल्यानंतर लॉकडाऊन दरम्यान वडिलांची काळजी घेण्यासाठी गुऊचरणने पुन्हा 2020 मध्ये शो सोडला. अभिनयापासून दूर राहिल्यानंतर गुऊचरण दिल्लीत आपल्या आई-वडिलांसोबत राहत होता.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article