गुरमीत राम रहीमच्या अडचणी वाढणार
9 वर्षे जुन्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा धक्का
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीमला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. बरगारी येथील श्री गुरू ग्रंथ साहिबच्या अपमानाच्या आरोपाखाली राम रहीमविऊद्ध 3 प्रकरणांमध्ये सुरू असलेली चौकशी सुरूच राहणार आहे. यावषी मार्चमध्ये पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने या प्रकरणांच्या चालू तपासावर स्थगिती दिली होती. त्या आदेशाला पंजाब सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. यासोबतच पंजाब सरकारच्या याचिकेवर न्यायालयाने राम रहीमला नोटीसही बजावली आहे. इतकेच नाही तर न्यायालयाने 4 आठवड्यांत उत्तरही मागितले आहे. याप्रकरणी न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई आणि के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने सुनावणी घेऊन नोटीस बजावली आहे.