गुरमीत राम रहीमला अटींसह पॅरोल मंजूर
हरियाणामध्ये जाऊन प्रचार करण्यास बंदी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
निवडणूक आयोगाने डेरा प्रमुख गुरमीत राम रहीमची पॅरोल याचिका अटींसह मंजूर केली आहे. पॅरोलच्या काळात गुरमीत राम रहीमला हरियाणात येण्यास बंदी घालण्यात येणार आहे. गुरमीत राम रहीमला प्रत्यक्ष किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणत्याही निवडणूक प्रचारकार्यात सहभागी होता येणार नाही. या अटींचे उल्लंघन केल्यास गुरमीत राम रहीमचा पॅरोल तात्काळ रद्द केला जाईल.
निवडणूक आयोगाच्या मंजुरीनंतर आता हरियाणा सरकार लवकरच गुरमीत राम रहीमला पॅरोलवर बाहेर येण्याचे आदेश जारी करू शकते. गुरमीत राम रहीम मंगळवारी तुऊंगातून बाहेर येण्याची शक्मयता आहे. यादरम्यान तो उत्तर प्रदेशातील बागपत येथील बरनावा आश्र्रमात राहू शकतो. राम रहीमने 20 दिवसांचा पॅरोल मागितला होता. आदर्श आचारसंहिता लागू असल्यामुमळे राज्य सरकारने मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) यांना पॅरोलसाठी विनंती पाठवली होती.