For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जाहीर प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

06:38 AM May 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
जाहीर प्रचाराच्या तोफा आज थंडावणार
Advertisement

सायंकाळी 6 नंतर उमेदवारांना घरोघरी प्रचार करण्यास मुभा

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

राज्यात दुसऱ्या टप्प्यातील (देश स्तरावर तिसरा टप्पा) लोकसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा गेल्या काही दिवसांपासून धडाडत होत्या. रविवारी सायंकाळी जाहीर प्रचार संपणार आहे. त्यामुळे मतदारांकडून घरोघरी मतदारांची भेट घेऊन मतयाचना करण्यावर उमेदवारांचा भर असेल. दरम्यान, राज्यात दुसऱ्या टप्प्यात उत्तर कर्नाटकातील बेळगाव, चिकोडीसह 14 मतदारसंघांमध्ये 7 मे रोजी मतदान होणार आहे.

Advertisement

राज्यात दुसऱ्या टप्प्यात लोकसभेसाठी मतदान होणाऱ्या 14 मतदारसंघांमध्ये रविवारी सायंकाळी 6 वाजता जाहीर प्रचार संपणार आहे. मतदान प्रक्रिया संपण्याच्या 48 तास अगोदर जाहीर प्रचाराची सांगता होणार आहे. त्यामुळे सायंकाळी 6 नंतर मतदारसंघातील मतदान नसणाऱ्या राजकीय पक्षातील नेते, कार्यकर्त्यांनी मतदारसंघाबाहेर जावे लागणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय पक्षांसह सर्व उमेदवारांनी मतदारसंघातील विविध भागात जोरदार प्रचार केला आहे. राष्ट्रीय पक्ष काँग्रेस व भाजप उमेदवारांच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांनी प्रचार केला. रविवारी सायंकाळपर्यंत जाहीर प्रचार करता येणार आहे. त्यामुळे प्रचारासाठी उमेदवारांमध्ये आघाडी घेण्यासाठी कसरत सुरू असल्याचे गेल्या काही दिवसांपासून पहावयास मिळत आहे.

अनेक दिग्गज नेते रिंगणात

माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, जगदीश शेट्टर, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांचे पुत्र खासदार बी. वाय. राघवेंद्र, माजी उपमुख्यमंत्री के. एस. ईश्वरप्पा, खासदार भगवंत खुबा, पी. सी. गद्दीगौडर, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पुत्र मृणाल हेब्बाळकर, सतीश जारकीहोळी यांची मुलगी प्रियांका जारकीहोळी, माजी आमदार अंजली निंबाळकर असे अनेक नेते दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणूक रिंगणात आहेत.

7 मे रोजी या मतदारसंघांत होणार मतदान

बेळगाव, चिकोडी, बागलकोट, गुलबर्गा, विजापूर, रायचूर, बिदर, कोप्पळ, बळ्ळारी, हावेरी, धारवाड, कारवार, दावणगेरे, शिमोगा

Advertisement
Tags :

.