कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गुलवीर सिंगचा डबल धमाका

06:52 AM May 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पुरुषांच्या 5000 मी शर्यतीत सुवर्णयश : उंच उडीत पूजाला तर हेप्टॅथ्लॉनमध्ये नंदिनीला सुवर्ण

Advertisement

वृत्तसंस्था/ गोमी, दक्षिण कोरिया

Advertisement

आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये चौथ्या दिवशी 5000 मीटर शर्यतीत गुलवीर सिंगने सुवर्णपदकाची कमाई केली. पिछाडीवरून त्याने जोरदार मुसंडी मारताना हे पदक जिंकून इतिहास घडवला. त्याचवेळी उंच उडीत पूजाने तर हेप्टाथलॉनमध्ये नंदिनी अगसाराने सुवर्णपदक मिळवत शानदार कामगिरी केली. तसेचमहिलांच्या 3000 मीटर स्टीपलचेस शर्यतीत पारुल चौधरीने राष्ट्रीय विक्रमासह रौप्यपदकाची कमाई केली. या कामगिरीसह पदकतालिकेत भारतीय संघ 8 सुवर्णपदकासह एकूण 18 पदकांची कमाई करत दुसऱ्या स्थानावर आहे.

पुरुषांच्या 5000 मीटर स्पर्धेच्या अंतिम फेरीत गुलवीर सिंगने दहा वर्षे जुना विक्रम काढला असून आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये दुसरे सुवर्णपदक जिंकले आहे. गुलवीरने 13 मिनिटे 24.77 सेकंद वेळ नोंदवत थायलंडच्या किरण टुनटिव्हेटला मागे टाकले. किरण टुनटिव्हेटने 13 मिनिटे 24.97 सेकंद वेळ नोंदवत रौप्यपदक पटकावले तर तर जपानच्या नागिया मोरीने 13 मिनिटे 25.06 सेकंद वेळ नोंदवून कांस्यपदक जिंकले. दरम्यानफ, मागील चॅम्पियनशिप स्पर्धेत हा विक्रम कतारच्या मोहम्मद अल-घरनीच्या नावावर होता. अल-घरनीने 2015 च्या हंगामात 13 मिनिटे 34.47 वेळ नोंदवली होती. विशेष म्हणजे, या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी गुलवीर सिंगने 10,000 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते.

उंच उडीत पूजाचे सुवर्णयश

पूजाने उंच उडीत सुवर्णपदक मिळवून भारताला मोठे यश मिळवून दिले. 18 वर्षीय पूजाने उझबेकिस्तानच्या सफिना सदुल्लाएवा (1.86 मीटर) हिला तिच्या शेवटच्या प्रयत्नात 1.89 मीटर उडी मारुन पराभूत केले. हरियाणाची खेळाडू असलेल्या पूजाचे वडील मजूर आहेत. पूजाने यापूर्वी 2023 मध्ये आशियाई अंडर-23 चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले होते.

नंदिनी अगसाराची गोल्डन कामगिरी, पारुल चौधरीला रौप्य

नंदिनी अगासराने महिलांच्या हेप्टथलॉनमध्ये सुवर्णपदक जिंकले. तिने सर्वोत्तम कामगिरी करताना 5941 गुणांची कमाई केली. या क्रीडा प्रकारात आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण जिंकणारी ती तिसरी भारतीय महिला आहे. तिने चिनच्या लियू जिंगीला 54 गुणांनी मागे टाकले आणि सुवर्णपदक जिंकले. नंदिनीच्या आधी सोमा बिस्वास (2005) व स्वप्ना बर्मन (2017) यांनी या स्पर्धेत हेप्टॅथलॉनमध्ये सुवर्ण जिंकले आहे. तेलंगणाची रहिवासी असणाऱ्या 20 वर्षीय नंदिनीने शानदार कामगिरी करताना हे यश खेचून आणले आहे.

दुसरीकडे, पारुल चौधरीने 9 मिनिटे 12.46 सेकंदात 3000 मीटर स्टीपलचेस शर्यत पूर्ण करताना राष्ट्रीय विक्रमासह रौप्यपदक नावावर केले. कझाकस्तानच्या नोराने या प्रकारात सुवर्णपदक जिंकले. अवघ्या 0.5 सेकंदाच्या फरकाने पारुलला सुवर्णपदकापासून वंचित रहावे लागले.

 दोन सुवर्ण जिंकणारा गुलवीर दुसरा भारतीय

एकाच आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत 5000 मी आणि 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत दुहेरी सुवर्णपदक जिंकणारा गुलवीर सिंग हा इतिहासातील दुसरा भारतीय ठरला आहे. याआधी, 2017 मध्ये लक्ष्मण गोविंदने या दोन्ही प्रकारात सुवर्णपदक जिंकण्याची किमया केली होती. यानंतर तब्बल 8 वर्षानंतर गुलवीरने हा धमाका केला आहे.

 

 

 

Advertisement
Tags :
#tarunbharatnews
Next Article