Gulmohar Day Satara : साताऱ्यात 'गुलमोहर डे' साजरा करण्यामागं नेमकं कारण काय?
मे महिन्यात गुलमोराच्या झाडाला बहर येत असल्याने लाल, केसरी फुलांनी ते झाड भरून येते
सातारा : साताऱ्यात 'गुलमोहर डे' साजरा करण्यात आला. साताऱ्यात 1 मे हा दिवस 'गुलमोहर डे' म्हणून साजरा केला जातो'. हा दिवस साजरा करणारे सातारा हे बहुदा जगातील पहिले शहर आहे. 1999 सालापासून साताऱ्यात हा दिवस साजरा केला जात आहे. मे महिन्यात गुलमोराच्या झाडाला बहर येतो. मे महिन्यात गुलमोराच्या झाडाला बहर येत असल्याने लाल, केसरी फुलांनी ते झाड भरून येते.
फुलांनी नख शिखांतवरून वाऱ्याच्या झुळकसोबत एक एक फुल जमिनीवर सोडून तांबड्या पाकळ्यांचा भरगच्च गालीचा पसरायचा. हा गोलमोराचा स्थायीभाव दरवर्षी अनुभवायला येतो. याची आठवण देणारा वर्षातला एक दिवस असावा असे वाटू लागले. गुलमोहराच्या फुलाला अर्पण केलेला दिवस म्हणून साताऱ्यात 'गुलमोहर डे' साजरा करण्याची पद्धत सुरू झाली आहे. दरवर्षी 1 मे कलासक्त मंडळी एकत्रित येतात आणि आपल्या परीने गुलमोहर वृक्षाचे आणि त्याच्या सौंदर्याचे वर्णन करतात.
साताऱ्यातील काही चित्रकला गोरमाला गुलमोहराची चित्रे देखील काढतात. कवी गुलमोहर कविता करतात. फोटोग्राफर कॅमेरात बंदिस्त केलेल्या गुलमोराच्या फोटोचे प्रदर्शन भरवतात. आजदेखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी 'गुलमोहर डे' साताऱ्यामध्ये उत्साहात जल्लोष साजरा करण्यात आला. त्या ठिकाणी गिटारच्या सुंदर मधुर अशा गाण्यांनी माहोल तयार झाला होता. साताऱ्यातील पवई नाक्याजवळच 67 गुलमोहराची झाड असणाऱ्या रस्त्यावर हा उपक्रम साजरा केला जातो. हा उपक्रम येथे दरवर्षी होत असल्यामुळे या रस्त्याला 'गुलमोहर रस्ता' असे नाव देण्यात आले आहे.