सफाईसाठी गुळदुवे ग्रामस्थ उतरले नदीपात्रात
05:47 PM Dec 25, 2024 IST
|
अनुजा कुडतरकर
Advertisement
सावंतवाडी । प्रतिनिधी
Advertisement
झाडी नदी पात्रात वाढल्यामुळे पावसाळ्यात पाण्याचा विसर्ग योग्य प्रकारे होत नाही . त्यामुळे पूर येण्याचा धोका संभवत असतो . पुरामुळे शेतीत पाणी घुसते व मोठी आपत्ती निर्माण होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होते. शासन स्तरावर उपाय योजना व्हावी ही विनंती करूनही काहीच उपाययोजना न झाल्याने अखेर गुळदुवे येथील गावकरीच आज एकत्र आले आणि त्यांनी नदीपात्रात साफसफाई मोहीम राबवली. या साफसफाई मोहिमेमध्ये रुपेश धरणे ,रवींद्र धरणे, नंदू धरणे ,प्रशांत खोबरेकर ,कमलकांत कोल्हे ,दिलीप मामलेकर मुकुंद धरणे , अरुण धरणे ,रघुनाथ धरणे ,रमाकांत शेटकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते .
Advertisement
Advertisement
Next Article