For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जांबावलीच्या शिशिरोत्सवाला प्रारंभ 2 रोजी दामोदराचा गुलालोत्सव

10:59 AM Mar 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
जांबावलीच्या शिशिरोत्सवाला प्रारंभ 2 रोजी दामोदराचा गुलालोत्सव
Advertisement

मडगाव : मठग्रामस्थ हिंदुसभेतर्फे साजरा करण्यात येणाऱ्या जांबावली शिशिरोत्सवाला प्रारंभ झाला असून त्याची सांगता बुधवार दि. 3 एप्रिल रोजी होणार आहे. शिशिरोत्सवातील मुख्य आकर्षण असलेला श्री दामोदराचा गुलालोत्सव मंगळवार दि. 2 एप्रिल रोजी संध्याकाळी 3.30 वा. साजरा केला जाणार आहे. शिशिरोत्सवाला बुधवार दि. 27 रोजी प्रारंभ झाला. या दिवशी रात्री 9.30 वा. जांबावली येथे श्री दामोदराचा हळदुण्याचा कार्यक्रम आणि कोंबवाडा-मडगाव येथील वै. पुरूषोत्तम पां. केणी यांच्या घरी नारळाची पूजा झाली. गुऊवार दि. 28 रोजी संध्याकाळी 5.30 वा. विठ्ठलवाडीहून बँड वादनासहीत हरदास त्रिविक्रम पै रायतुरकर यांच्या निवासस्थानी प्रयाण, सायंकाळी 6 वा. कोंबवाडा येथील वै. पु. पां. केणी यांच्या घरी पुजलेल्या नारळाची भव्य मिरवणूक जांबावली येथे श्री दामोदर संस्थानपर्यंत निघाली. या मिरवणुकीत मठग्रामस्थ हिंदुसभेचे भाई नायक,

Advertisement

प्रभव नायक, वैकुंठ पै फोंडेकर, शर्मद पै रायतूरकर, नितीन नायक व इतरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. रात्री 10 वा. ‘सं. सीता स्वयंवर’ या नाटकाचा प्रयोग झाला. आज शुक्रवार दि. 29 रोजी रात्री 10 वा. मठग्रामस्थ हिंदु सभा कला विभाग, फ्रायडे सुपरस्टार प्रस्तुत कोकणी नाटक ‘मठग्राम फाईल्स दी अनटोल्ड स्टोअरीस’ सादर करण्यात येईल. शनिवार दि. 30 रोजी रात्री 10 वा. मठग्रामस्थ हिंदू सभा कला विभागतर्फे दोन अंकी कोकणी नाटक ‘ताची करामत’ सादर केले जाणार आहे. रविवार दि. 31 रोजी सायंकाळी 7 वा. त्रिमूर्ती रसिकमित्र निर्मित भावगीत व भक्तीगीतांचा कार्यक्रम ‘तुझे गीत गाण्यासाठी’ सादर करण्यात येईल. त्यानंतर रात्री 10 वा. तीन अंकी विनोदी कोकणी खेळ ‘झिलबा राणो 2.0’. सोमवार दि. 1 एप्रिल रोजी संध्याकाळी 6 वा. फॅन्सी ड्रेस स्पर्धा व रेकॉर्ड डान्स स्पर्धा. दोन्ही स्पर्धांसाठी गट सात वर्षांपर्यंत व सात ते चौदा पर्यंत. रात्री 9 वा. ‘तुझ्या रूपाचं चांदणं’ हा लावणीचा कार्यक्रम सादर होईल. पहाटे 3 वा. मध्ययुगीन प्रणयकथेवरील खेळकर नाटक संगीत ‘मदनाची मंजिरी’ सादर करण्यात येईल.

2 रोजी प्रसिद्ध गुलालोत्सव

Advertisement

संपूर्ण गोव्यासहीत शेजारील कर्नाटक व महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला श्री दामबाबाचा गुलालोत्सव मंगळवार दि. 2 एप्रिल रोजी संध्याकाळी 3.30 वा. साजरा केला जाणार आहे. भाविकांनी गुलालोत्सवात फक्त लाल रंगाचा गुलाल वापरावा असे आवाहन मठग्रामस्थ हिंदुसभेतर्फे करण्यात आले आहे. याच दिवशी रात्री 11 वा. ‘नवरदेवाची वरात’ निघेल. त्यानंतर रात्री 12 वा. सदाबहार संगीताचा कार्यक्रम ‘संगीत सभा’ होईल. बुधवार दि. 3 रोजी सकाळी 11 वा. होणाऱ्या ‘धुळपेट’ने शिशिरोत्सवाची सांगता होईल.

Advertisement
Tags :

.