गुकेशचा अब्दुसत्तोरोव्हवर विजय, प्रज्ञानंदची कारुआनाशी बरोबरी
वृत्तसंस्था/ सेंट लुईस, अमेरिका
सेंट लुईस येथे झालेल्या सिंकफिल्ड कपच्या दुसऱ्या फेरीत विश्वविजेत्या डी. गुकेशने सुऊवातीच्या फेरीतील धक्का मागे टाकत माजी जागतिक रॅपिड विजेता नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्हवर उत्कृष्ट विजय मिळवला.
याच दिवशी आर. प्रज्ञानंदने अमेरिकेच्या फॅबियानो काऊआनासोबत शांतपणे खेळ करून बरोबरी साधली, तर फ्रान्सच्या अलिरेझा फिरोजाने दिवसाच्या दुसऱ्या निर्णायक सामन्यात पोलंडच्या दुडा जान-क्रझिस्टोफच्या बचावफळीला भेदत शेवटच्या टप्प्यात कसे खेळायचे याचा एक उत्तम धडा दिला. अमेरिकेच्या लेव्हॉन अॅरोनियनने सहकारी सॅम्युअल सेव्हियनसोबत बरोबरी साधली आणि संयुक्तपणे आघाडी कायम राखली,तर अमेरिकेच्या वेस्ली सोने 10 खेळाडूंच्या आणि 3,75,000 अमेरिकन डॉलर्सची बक्षिसे असलेल्या या स्पर्धेत फ्रान्सच्या मॅक्सिम वाचियर-लाग्रेव्हसोबत बरोबरी साधली. सात फेऱ्या अजून बाकी असताना प्रज्ञानंद, अॅरोनियन आणि फिरोजा हे 1.5 गुणांसह आघाडीवर आहेत.
गुकेश काऊआना, वेस्ली सो, सेव्हियन आणि वाचियर-लाग्रेव्ह यांच्यासह संयुक्तपणे चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. दुडा अर्ध्या गुणांसह नवव्या स्थानावर आहे, तर अब्दुसत्तोरोव्हने सलग दुसरा गेम गमावल्याने अद्याप त्याचे खाते उघडलेले नाही. गेल्या शतकात दिग्गज व्हिक्टर कोचरोनोईने लोकप्रिय केलेल्या ओपन सिसिलियनशी गुकेशचा सामना झाला. काऊआनासह वरिष्ठ स्तरावर या प्रकाराचे अनेक चाहते आहेत, परंतु आजकाल प्रतिष्ठित खेळाडूंचा त्याकडे फारसा कल राहत नाही. परंतु गुकेशने योग्य युक्त्यांचा वापर करत त्याला उत्तर दिले. जरी उझबेक खेळाडूसाठी प्रतिहल्ल्यास वाव राहिला, तरी वेळ झपाट्याने सरत असताना अचूक चाली शोधणे कठीण होते. गुकेशने खेळाच्या शेवटच्या टप्प्यात वर्चस्व गाजवत हा सामना आपल्या खात्यात जमा केला.
दुसरीकडे, प्रज्ञानंदने कारुआनाला त्याच्याच औषधाची चव देण्याचा निर्णय घेतला आणि मॅग्नस कार्लसनविऊद्धच्या जागतिक अजिंक्यपद सामन्यात अमेरिकी खेळाडूने मोठ्या प्रमाणात वापरलेल्या रोसोलिमो व्हेरिएशनचा वापर केला. तथापि, अमेरिकन खेळाडूने मधल्या खेळात आपली समज दाखविली आणि शेवटी ही लढत बरोबरीत सुटली. फिरोजालाही खेळाच्या शेवटच्या टप्प्यात आपले कौशल्य दाखवावे लागले आणि फ्रेंच खेळाडूने ते निर्दोषपणे साध्य करत विजय नोंदविला.