दोन विजय मिळवित गुकेश चौथ्या स्थानावर
वृत्तसंस्था/सेंट लुईस, अमेरिका
ग्रँड चेस टूरचा भाग असलेल्या सेंट लुईस रॅपिड आणि ब्लिट्झच्या रॅपिड विभागाच्या शेवटी जागतिक विजेता डी. गुकेशने अमेरिकेच्या लीनियर दुमिंग्वेझ पेरेझविऊद्धच्या पराभवाला मागे सारत वेस्ली सो आणि फॅबियानो काऊआना या अमेरिकन जोडीला हरवून चौथ्या स्थानावर झेप घेतली. 1,75,000 अमेरिकन डॉलर्सची इनामे असलेल्या या स्पर्धेत 18 ब्लिट्झ गेम अजून बाकी असून गुकेशने पराभवाने सुऊवात केली आणि तरीही चौथे स्थान मिळवले, जे चांगले दिसते. गुकेशविऊद्ध पराभव झाला असला, तरी काऊआना 14 गुणांसह रॅपिड फेरीत अव्वल स्थानावर राहिला आहे. अमेरिकन खेळाडूनंतर आर्मेनियन-अमेरिकन लेव्हॉन आरोनियन आहे, ज्याचे 13 गुण झाले आहेत.
फ्रान्सचा मॅक्सिम वाचियर-लाग्रेव्ह 11 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे, जो आतापर्यंत स्पर्धा संमिश्र राहिलेल्या गुकेशपेक्षा एक गुणाने पुढे आहे. दुमिंग्वेझ, वेस्ली आणि उझबेकिस्तानचा नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्ह नऊ गुणांसह संयुक्तपणे पाचव्या स्थानावर आहेत. व्हिएतनामच्या लिम ले क्वांगपेक्षा ते दोन गुणांनी पुढे आहेत. पाच गुणांसह अमेरिकी सॅम शँकलँड नवव्या स्थानावर आहे, तर ग्रिगोरी ओपरिनचे फक्त तीन गुण झाले आहेत आणि तो शेवटच्या स्थानावर आहे. दुमिंग्वेझविरुद्धच्या सामन्यात गुकेशचे स्थान सुरुवातीला चांगले होते, पण मधल्या खेळाच्या शेवटच्या टप्प्यात ते बिघडले आणि दुमिंग्वेझ विजयाची नोंद करण्यात यशस्वी ठरला. भारतीय खेळाडूने त्याची भरपाई नंतर वेस्ली सोविऊद्धच्या सामन्यात केली. वेस्ली दबाव सहन करू शकला नाही आणि रॅपिडच्या शेवटून दुसऱ्या फेरीत पूर्णपणे पराभूत झाला. काऊआनाने शेवटच्या फेरीत गुकेशला जवळजवळ मागे टाकले होते, पण त्याच्या चुकीमुळे त्याला मोठी किंमत मोजावी लागली आणि त्यामुळे गुकेशच्या बाजूने निकाल लागला.