For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुकेशने कारुआनाला बरोबरीत रोखले,

06:50 AM Apr 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
गुकेशने कारुआनाला बरोबरीत रोखले
Advertisement

विदितच्या वाट्याला पराभव

Advertisement

वृत्तसंस्था/ टॉरंटो

Advertisement

कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेच्या चौथ्या फेरीत ग्रँडमास्टर डी. गुकेशने अव्वल मानांकित अमेरिकेच्या फॅबियानो काऊआनाला बरोबरीत रोखून चांगली कामगिरी करून दाखविली, तर विदित गुजराथीला रशियाच्या इयान नेपोम्नियाचीकडून पराभव पत्करावा लागला.

दुसरीकडे, आर. प्रज्ञानंदने अमेरिकेच्या हिकारू नाकामुरासोबत बरोबरी साधली, तर अझरबैजानच्या निजात आबासोव्हला फ्रान्सच्या फिरोजा अलीरेझासोबतचा सामना बरोबरीत सोडविताना बराच संघर्ष करावा लागला. आठ खेळाडूंच्या दुहेरी राऊंड-रॉबिन स्पर्धेत त्यांनी आपले आव्हान जिवंत ठेवले असून जगज्जेत्याचा आव्हानवीर या स्पर्धेतून ठरणार आहे.

पांढऱ्या सोंगाट्या घेऊन खेळताना मिळविलेल्या दुसऱ्या विजयानंतर नेपोम्नियाची हा या स्पर्धेत तीन गुणांसह आघाडीवर गेला आहे. या स्पर्धेत आतापर्यंत आघाडीला एकच बुद्धिबळपटू राहण्याची ही पहिलीच खेप आहे. काऊआना आणि गुकेश यांनी प्रत्येकी 2.5 गुण मिळवले आहे. चौथ्या स्थानावर असलेला प्रज्ञानंदही फारसा मागे नसून त्याचे 2 गुण झाले आहेत, तर गुजराती, आबासोव्ह, अलीरेझा आणि नाकामुरा यांचे प्रत्येकी 1.5 गुण झाले आहेत.

महिला विभागात आर. वैशालीने आपला भाऊ प्रज्ञानंदप्रमाणेच कामगिरी करताना भक्कम दावेदार मानल्या जाणाऱ्या रशियाच्या अॅलेक्झांड्रा गोर्याचकिनासोबत बरोबरी साधली, तर कोनेरू हम्पीला सर्वांत कमी मानांकित आणि सर्वांत तरुण स्पर्धक असलेल्या बल्गेरियाच्या नुरग्युल सलीमोव्हासमोर पहिल्या पराभवाला सामोरे जावे लागले. झोंगयी टॅनने रशियाच्या कॅटेरिना लागनोसोबत बरोबरी साधून तीन गुणांसह आघाडी कायम राखली आहे. चीनच्या टिंगजी लेईनेही युक्रेनच्या अॅना मुझीचुकसोबतचा सामना बरोबरीत सोडविला.

टॅन सध्या आघाडीवर असून गोर्याचकिना 2.5 गुणांसह तिच्या मागोमाग आहे. गोर्याचकिना आणि वैशाली, सलीमोव्हा व लागनो या त्रिकूटाच्या दरम्यान अर्ध्या गुणाचा फरक आहे. तर हंपीच्ाा 1.5 गुण झाला असून ती घसरून मुझीचुक आणि लेई यांच्यासह संयुक्तपणे सहाव्या स्थानावर पोहोचली आहे.

Advertisement
Tags :

.