For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुकेश - प्रज्ञानंद लढत बरोबरीत

06:42 AM Jun 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
गुकेश   प्रज्ञानंद लढत बरोबरीत
Advertisement

वृत्तसंस्था/ बुखारेस्ट (रोमानिया)

Advertisement

ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदला सुपरबेट क्लासिक बुद्धिबळ स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत देशबांधव डी. गुकेशविऊद्धचा सामना बरोबरीत सोडवल्याने संयुक्तपणे आघाडीवर जाण्यापासून वंचित राहावे लागले. या वर्षाच्या सुऊवातीला एप्रिलमध्ये झालेल्या कँडिडेट्स स्पर्धेत गुकेशकडून पराभूत झालेल्या प्रज्ञानंदला त्याची परतफेड करण्याची उत्तम संधी होती. परंतु त्याला विजयाची नोंद करता आली नाही आणि गुकेशने शेवटी बरोबरीवर समाधान मानण्यास त्याला भाग पाडले.

खरे तर 53 व्या चालीतील एक घोडचूक गुकेशनला महागात पडली असती. एरव्ही या परिस्थितीचा प्रज्ञानंदने व्यवस्थित फायदा घेतला असता. परंतु नशीब गुकेशवर प्रसन्न झाले आणि काही चालींनंतर सामना अनिर्णित अवस्थेत संपुष्टात आला. दहा खेळाडूंच्या दुहेरी राऊंड-रॉबिन पद्धतीने खेळविल्या जाणाऱ्या या स्पर्धेतील तीन दिवसांत प्रथमच पाचही सामने अनिर्णीत राहिले.

Advertisement

विजयाच्या जवळ आलेला दुसरा खेळाडू मॅक्सिम वॅचियर-लॅग्रेव्ह होता, ज्याने त्याचा फ्रेंच सहकारी अलिरेझा फिरोजाला जवळजवळ पराभूत केले होते. तथापि, मिडल गेममध्ये उशिरा झालेल्या चुकीमुळे वॅचियर-लॅग्रेव्हच्या हातातून विजय निसटला. सर्व सामने अनिर्णीत राहिल्याने आघाडीचे स्थान कायम राहिले असून गुकेश अमेरिकेच्या फॅबियानो काऊआनासह संयुक्तपणे आघाडीवर आहे. कारुआनाने उझबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्हविऊद्धचा चुरशीचा सामना अनिर्णीत राखला.

गुकेश व कारुआना प्रत्येकी दोन गुणांसह आघाडीवर असून वॅचियर-लाग्रेव्ह, प्रज्ञानंद, अलिरेझा, वेस्ली सो, गिरी आणि नेपोम्नियाची हे प्रत्येकी 1.5 गुणासह तिसऱ्या स्थानावर आहेत. 3 लाख 50 हजार डॉलर्सच्या बक्षीस रकमेच्या या स्पर्धेत सहा फेऱ्या बाकी असून अब्दुसत्तोरोव्ह आणि बोगदान डॅनियल हे आणखी अर्ध्या गुणाने मागे आहेत. दुसरीकडे, डच खेळाडू अनीश गिरीने त्याच्या 30 व्या वाढदिवसाला रशियन इयान नेपोम्नियाचीविऊद्धचा सामना बरोबरीत सोडविला

Advertisement
Tags :

.