कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

घसरलेल्या हैदराबादसमोर आज गुजरातचे आव्हान

06:50 AM Apr 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ हैदराबाद

Advertisement

सनरायझर्स हैदराबादची आज रविवारी येथे होणाऱ्या पाचव्या आयपीएल सामन्यात गुजरात टायटन्सशी गाठ पडणार असून हैदराबाद पराभवाच्या हॅटट्रिकनंतर आपली घसरगुंडी रोखण्यासाठी उत्सुक असेल. मात्र त्यासाठी त्यांना त्यांच्या आक्रमक तत्त्वज्ञानासंबंधी आत्मपरीक्षण करण्याचा प्रयत्न नक्कीच करावा लागेल. स्पर्धेची सुऊवात दमदारपणे करून पहिल्या सामन्यात 286 धावा काढल्यानंतर अतिआक्रमक दृष्टिकोन हैदराबाद संघावर बूमरँग झाला आहे. पुढील तीन सामन्यांतील संघाची एकूण धावसंख्या 190, 163 आणि 120 अशी राहिलेली आहे.

Advertisement

हैदराबाद संघ सध्या गुणतालिकेत 10 व्या स्थानावर आहे आणि असे दिसते की, विश्वविजेता कर्णधार पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघ घसरत आहे. ही स्थिती बदलण्यासाठी ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, हेनरिक क्लासेन यांना बरेच कष्ट काढावे लागणार आहेत. कारण आणखी काही पराभव त्यांचे आव्हान मिटवून जाऊ शकते. गोलंदाजी हा देखील चिंतेचा विषय आहे. कारण तऊण लेगस्पिनर झीशान अन्सारी (9.75 च्या इकोनॉमी रेटने 4 बळी) वगळता कोणताही गोलंदाज धोकादायक दिसलेला नाही. हैदराबादसाठी दिलासादायक बाब म्हणजे भरपूर धावसंख्येसाठी प्रसिद्ध असलेल्या उप्पल स्टेडियमवर ते पुन्हा लढतील.

दुसरीकडे, बी. साई सुदर्शन, कर्णधार शुभमन गिल आणि बटलर यांचा समावेश असल्याने टायटन्सची फलंदाजी मजबूत दिसत आहे. शेरफेन रदरफोर्ड आणि राहुल तेवतिया हे मधल्या फळीत दोन मोठे हिटिंग फिनिशर आहेत आणि शाहऊख खान हा एकमेव कमकुवत दुवा दिसत आहे. तथापि, टायटन्सचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा नसल्यामुळे त्यांना अडचणी येतील. तो वैयक्तिक कारणांमुळे मायदेशी परतला आहे. आगामी सामन्यांत रबाडाची जागा कोण घेईल हे पाहणे रंजक ठरेल.

संघ : सनरायझर्स हैदराबाद-पॅट कमिन्स (कर्णधार), इशान किशन, अथर्व तायडे, अभिनव मनोहर, अनिकेत वर्मा, सचिन बेबी, हेनरिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड, हर्षल पटेल, कामिंदू मेंडिस, वियान मुल्डर, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रे•ाr, मोहम्मद शमी, राहुल चाहर, अॅडम झॅम्पा, सिमरजित सिंग, झीशान अन्सारी, जयदेव उनाडकट, इशान मलिंगा.

गुजरात टायटन्स-शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर, बी. साई सुदर्शन, शाहऊख खान, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, राहुल तेवतिया, रशिद खान, निशांत सिंधू, महिपाल लोमरोर, कुमार कुशाग्र, अनुज रावत, मानव सुथार, वॉशिंग्टन सुंदर, जेराल्ड कोएत्झी, मोहम्मद अर्शद खान, गुरनूर सिंग ब्रार, शेरफेन रदरफोर्ड, आर. साई किशोर, इशांत शर्मा, जयंत यादव, ग्लेन फिलिप्स, करीम जनात, कुलवंत खेजरोलिया.

सामन्याची वेळ : सायं. 7.30 वा.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article