गुजरातचा मुकाबला आज चेन्नईशी
वृत्तसंस्था/अहमदाबाद
इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज रविवारी गुजरात टायटन्स व चेन्नई सुपर किंग्स हे दोन्ही संघ एकमेकांसमोर येतील तेव्हा गुजरात आघाडीच्या दोन संघांमध्ये स्थान मिळवण्याचे लक्ष्य ठेवेल, तर चेन्नई सुपर किंग्स भविष्यासाठीचे त्यांचे नियोजन लक्षात ठेवून मैदानात उतरेल. रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर सनरायझर्स हैदराबादकडून पराभूत झाल्यामुळे टायटन्सला पहिल्या दोन संघांमध्ये जाण्याची संधी प्राप्त झाली आहे. सीएसकेविऊद्धच्या विजयामुळे त्यांचे 20 गुण होतील आणि आघाडीच्या दोन संघांमधील त्यांचे स्थान निश्चित होईल, ज्यामुळे त्यांना अंतिम फेरीत प्रवेश करण्याच्या दोन संधी मिळतील. प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडलेला सीएसके भविष्याची तयारी करण्यावर लक्ष केंद्रीत करेल आणि ते त्यांचे तऊण खेळाडू आणि विविध संयोजनांची चाचणी घेण्याचा प्रयत्न करतील.
गुजरातचा संघ फलंदाजीत वरच्या फळीवर अवलंबून आहे, ज्यामध्ये शुभमन गिल, साई सुदर्शन आणि जोस बटलर यांचा समावेश आहे. बटलर आजच्या शेवटच्या लीग सामन्यानंतर राष्ट्रीय संघात सामील होण्यासाठी रवाना होईल. बटलर प्ले-ऑफसाठी उपलब्ध राहणार नसल्याने मधल्या फळीला खेळण्याची अधिक संधी मिळणे अत्यंत गरजेचे आहे. त्यांच्यासाठी मोठी चिंता गोलंदाजी विभागात आहे. कारण स्टार फिरकी गोलंदाज रशिद खान यावेळी सुरात नाही.
गुजरातने वेगवान गोलंदाजी विभागातही सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. लीग टप्प्यानंतर रबाडा राष्ट्रीय संघात सामील होण्यासाठी रवाना होणार आहे. त्यावेळी ही समस्या आणखी वाढू शकते. दुसरीकडे, रविवारी दुपारी काहीही झाले, तरी सीएसके गुणतालिकेच्या तळाशीच राहण्याची शक्यता आहे. त्यांच्या आयुष म्हात्रे, उर्विल पटेल आणि देवाल्ड ब्रेव्हिससारख्या तऊण खेळाडूंसाठी हा सामना म्हणजे प्रभाव पाडण्याची आणखी एक संधी आहे.
संघ
गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, कुमार कुशाग्र, अनुज रावत, रशिद खान, राहुल तेवतिया, शाहऊख खान, निशांत सिंधू, रविश्रीनिवासन साई किशोर, गेराल्ड कोएत्झी, जयंत यादव, अर्शद खान, करीम जनात, शेरफेन रदरफोर्ड, महिपाल लोमरोर, वॉशिंग्टन सुंदर, मानव सुतार, गुरनूर बार, इशांत शर्मा, कागिसो रबाडा, प्रसिद्ध कृष्णा, कुलवंत खेजरोलिया, मोहम्मद सिराज, दासुन शनाका, कुसल मेंडिस, जोस बटलर.
चेन्नई सुपर किंग्स : एम. एस. धोनी (कर्णधार), शेख रशिद, आंद्रे सिद्धार्थ सी, राहुल त्रिपाठी, डेव्हॉन कॉनवे, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, विजय शंकर, दीपक हुडा, अंशुल कंबोज, रचिन रवींद्र, जेमी ओव्हरटन, कमलेश नागरकोटी, रामकृष्ण घोष, रविचंद्रन अश्विन, सॅम करन, मथिशा पाथीराना, श्रेयस गोपाल, मुकेश चौधरी, नॅथन एलिस, नूर अहमद, खलील अहमद, आयुष म्हात्रे, देवाल्ड ब्रेविस, उर्विल पटेल.
सामन्याची वेळ : दुपारी 3.30 वा.