गुजरात टायटन्सचा आज राजस्थान रॉयल्सशी मुकाबला
वृत्तसंस्था/ .अहमदाबाद
गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज बुधवारी आयपीएलमधील लढत होणार असून यावेळी आपले मजबूत गोलंदाजी विभाग प्रभाव दाखवतील, अशी आशा त्यांना असेल. लीगमध्ये प्रगतीच्या दृष्टीने ते त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. टायटन्सचे आता सहा गुण झाले आहेत आणि विजय त्यांना गुणतालिकेत अव्वल स्थानावर ठेवेल, तर रॉयल्स, ज्यांचे आता चार गुण झाले आहेत, त्यांना गुणतालिकेच्या मध्यभागी चाललेल्या रस्सीखेचीतून मुक्त होण्यासाठी विजयाची आवश्यकता आहे.
गुजरातने सलग तीन विजय मिळवले आहेत आणि राजस्थानने सलग दोन सामन्यांत विजय मिळवला आहे. गुजरात संघ वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि फिरकी गोलंदाज आर. साई किशोर यांच्यावर अवलंबून आहे. परंतु बेंगळूर आणि हैदराबाद येथील अधिक उपयुक्त खेळपट्ट्यांवर खेळतानाही मुख्य फिरकीपटू रशिद खान, अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा हे उत्साहवर्धक दिसले नाहीत. टी-20 मध्ये एक उत्तम गोलंदाज असलेल्या रशिदने चार सामन्यांत फक्त एक बळी घेतला आहे आणि प्रति षटक 10 धावा दिल्या आहेत. दुसरीकडे, इशांतनेही तीन सामन्यांत फक्त एक बळी घेतला आहे आणि प्रति षटक 12 धावा दिल्या आहे. दुर्दैवाने, गुजरातकडे कोणताही तयार बॅक-अप उपलब्ध नाही. कारण अर्शद खान किंवा फजलहक फाऊकीसारखे वेगवान गोलंदाज पुढे आलेले नाहीत.
राजस्थानच्या संघात संजू सॅमसन, ध्रुव जुरेल, रियान पराग आणि नितीश राणा अशी काही स्फोटक नावे आहेत. सूर गमावलेल्या यशस्वी जैस्वालने अखेर पंजाब किंग्सविऊद्धच्या सामन्यात 67 धावा केल्या. या सामन्यातही तो अशीच कामगिरी करून दाखवेल, अशी रॉयल्सना आशा असेल. गोलंदाजी विभागात वेगवान गोलंदाज संदीप शर्मा वगळता त्यांचा इतर कोणताही गोलंदाज धावांचा प्रवाह रोखू शकलेला नाही. तथापि, पंजाब किंग्सविऊद्धच्या लढतीतील जोफ्रा आर्चरचा प्रयत्न (4-0-25-3) त्यांना दिलासा देऊन जाईल. गुजरातच्या बाबतीत कर्णधार शुभमन गिल, जोस बटलर, शेरफेन ऊदरफोर्ड आणि बी. साई सुदर्शन हे चांगल्या सुरात असून किंग्सविऊद्धच्या सामन्यातून त्यात वॉशिंग्टन सुंदरचा भर पडली आहे.
संघ : गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), बी. साई सुदर्शन, जोस बटलर, शाहऊख खान, शेरफेन रदरफोर्ड, राहुल तेवतिया, रशिद खान, कागिसो रबाडा, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, इशांत शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, अनुज रावत, महिपाल लोमरोर, अर्शद खान, जयंत यादव, निशांत सिंधू, कुलवंत खेजरोलिया, जेराल्ड कोएत्झी, मानव सुतार, कुमार कुशाग्रा, गुरनूर ब्रार, करीम जनात.
राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभम दुबे, नितीश राणा, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरोन हेटमायर, जोफ्रा आर्चर, महेश थीक्षाना, तुषार देशपांडे, संदीप शर्मा, फजलहक फाऊकी, कुणाल सिंह राठोड, आकाश मधवाल, कुमार कार्तिकेय, क्वेना मफाका, वानिंदू हसरंगा, युधवीर सिंह चरक, अशोक शर्मा, वैभव सूर्यवंशी.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.