For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

पंजाब किंग्जपुढे आज गुजरात टायटन्सचे आव्हान

06:48 AM Apr 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
पंजाब किंग्जपुढे आज गुजरात टायटन्सचे आव्हान

वृत्तसंस्था/ अहमदाबाद

Advertisement

मयंक यादवच्या वेगवान माऱ्याचा फटका बसलेल्या पंजाब किंग्जच्या फलंदाजांना आज गुरुवारी येथे गुजरात टायटन्सचा सामना करताना एका वेगळ्याच आव्हानाला सामोरे जावे लागेल. गुजरात टायटन्सचे गोलंदाज किंचित फसव्या मोटेराच्या खेळपट्टीवर वेगात बदल करून त्यांना सापळ्यात अडकविण्याचा प्रयत्न करतील.

Advertisement

किंग्जने त्यांचे मागील दोन दूरस्थ सामने गमावले आहेत आणि टायटन्सविऊद्धही पराभव स्वीकारावा लागल्यास त्यांची गती आणखी कमी होईल. दुसरीकडे, टायटन्सने मागील सामन्यात सनरायझर्स हैदराबादला सात गडी राखून पराभूत केल्यानंतर हा संघ आत्मविश्वासाने भरलेला आहे. मागील सामन्यात मयंकच्या वेगापुढे किंग्ज पूर्णपणे गडबडून गेले आणि त्यांचे वरच्या फळीतील बहुतांश फलंदाज या वेगवान गोलंदाजाचा सामना करण्यास सुसज्ज दिसले नाहीत. तथापि, आज जेव्हा अनुभवी मोहित शर्मा मारा करू लागेल तेव्हा परिस्थिती पूर्णपणे वेगळी असेल. मोहित फसवे चेंडू, स्लो बाउन्सर आणि वाईड यॉर्कर्सचा चांगला वापर करतो.

Advertisement

पंजाबच्या शिखर धवन, जॉनी बेअरस्टो आणि जितेश शर्मा यांच्यासाठी हे वेगळ्या प्रकारचे आव्हान असेल, कारण त्यांना चेंडू बॅटवर वेगाने येणे आवडते. मागील सामन्यात धोंडशीर दुखावल्यानंतर आजच्या सामन्यासाठी लियाम लिव्हिंगस्टोन अनुपलब्ध असल्यास ते पंजाबसाठी मारक ठरेल. कारण त्यामुळे डेथ ओव्हर्समधील त्यांचा हुकमी एक्का त्यांना वापरता येणार नाही. याशिवाय पंजाबला रशिद खानच्या अचूकतेचा आणि नूर अहमदचा सामना करावा लागेल. तिसरा अफगाणी खेळाडू अजमतुल्ला ओमरझाईचे अष्टपैलू कौशल्यही त्यांच्यासाठी आव्हान असेल.

पंजाबच्या फलंदाजीपेक्षा त्यांची गोलंदाजी, खास करून अंतिम षटकांतील मारा ही चिंतेची बाब आहे. हर्षल पटेलसाठी आतापर्यंत दयनीय हंगाम राहिला असून त्याने प्रति षटक 11.41 सरासरीने धावा दिलेल्या आहेत. त्याने तिन्ही सामन्यांमध्ये आपला कोटा पूर्ण केला. तितकीच निराशाजनक कामगिरी लेगस्पिनर राहुल चहरची आहे, ज्याने 11.37 च्या सरासरीने धावा दिलेल्या आहेत आणि तो षटकांचा कोटाही पूर्ण करू शकलेला नाही. भारताचा ‘डेथ ओव्हर्स यॉर्कर स्पेशलिस्ट’ अर्शदीप सिंगने देखील किंग्जच्या चिंता वाढवल्या आहेत.

टायटन्सच्या बाबतीत गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जविऊद्धच्या त्यांच्या कामगिरीला अपवाद म्हणता येईल. कारण त्यांनी त्यांच्या योजना चांगल्या प्रकारे राबवल्या आहेत. मात्र त्यांची फलंदाजी अजून एकसंधपणे चमकू शकलेली नाही. परंतु गोलंदाजी विभागाने सुऊवातीच्या सामन्यात धावसंख्येचा चांगल्या प्रकारे बचाव करून आणि मागील सामन्यात आक्रमक सनरायझर्सला बऱ्यापैकी रोखून दाखविलेले आहे.

संघ : गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड, वृद्धिमान साहा, रॉबिन मिन्झ, केन विल्यमसन, अभिनव मंधार, बी. साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, विजय शंकर, अजमतुल्ला ओमरझाई, शाहऊख खान, जयंत यादव, राहुल तेवतिया, कार्तिक त्यागी, शशांत मिश्रा, स्पेन्सर जॉन्सन, नूर अहमद, साई किशोर, उमेश यादव, रशिद खान, जोशुआ लिटल, मोहित शर्मा आणि मानव सुतार.

पंजाब किंग्ज : शिखर धवन (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा, सिकंदर रझा, ऋषी धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, अथर्व तायडे, अर्शदीप सिंग, नॅथन एलिस, सॅम करन, कागिसो रबाडा, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, हरप्रीत भाटिया, विद्वत कावेरप्पा, शिवम सिंग, हर्षल पटेल, ख्रिस वोक्स, आशुतोष शर्मा, विश्वनाथ प्रताप सिंह शशांक सिंग, तनय त्यागराजन, प्रिन्स चौधरी, रिली रोसोव.

सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.

Advertisement
Tags :
×

.