स्टार्टअप इकोसिस्टममध्ये गुजरात, केरळ व कर्नाटकची कामगिरी अव्वल
डीपीआयआयटीच्या अहवालामधून माहिती समोर
नवी दिल्ली :
नवोदित उद्योजकांसाठी स्टार्टअप इकोसिस्टम विकसित करण्यात गुजरात, केरळ आणि कर्नाटक ही सर्वोत्तम कामगिरी करणारी राज्ये म्हणून उदयास आली आहेत. डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड (डीपीआयआयटी) द्वारे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या क्रमवारीत हे उघड झाले आहे.
केरळ, तामिळनाडू आणि हिमाचल प्रदेशलाही सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यांमध्ये स्थान मिळवले आहे. महाराष्ट्र, ओडिशा, पंजाब, राजस्थान, तेलंगणा, अरुणाचल प्रदेश आणि मेघालय या राज्यांना अव्वल परफॉर्मर म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. यात एकूण 33 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. सर्वोत्कृष्ट परफॉर्मर्स, टॉप परफॉर्मर्स, लीडर, महत्त्वाकांक्षी नेते आणि उदयोन्मुख स्टार्टअप इकोसिस्टम विकसित करणारे या पाच श्रेणींमध्ये विभागले आहेत.