कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गुजरात- हैदराबाद दोघांनाही विजयाची गरज

06:05 AM May 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/अहमदाबाद

Advertisement

आयपीएलमध्ये आज शुक्रवारी येथे होणाऱ्या लढतीत सनरायझर्स हैदराबादचा सामना करताना गुजरात टायटन्स ‘वंडरबॉय’ वैभव सूर्यवंशीने केलेल्या हल्ल्यातून सावरण्याचा प्रयत्न करेल. राजस्थान रॉयल्सच्या सूर्यवंशीने केवळ 35 चेंडूंत हंगामातील सर्वांत जलद शतक झळकावल्याने गुजरातला मोठा धक्का बसला. गुजरातने 4 बाद 209 अशी जबरदस्त धावसंख्या उभारूनही आठ गड्यांनी त्यांना पराभव पत्करावा लागला.

Advertisement

मात्र या निकालाने या आयपीएलमधील गुजरातच्या स्थानात बदल झालेला नाही. टायटन्स अजूनही या हंगामातील सर्वांत सातत्यपूर्ण संघांपैकी एक असून फलंदाजी आणि गोलंदाजी, दोन्हीमध्ये मोठी ताकद असल्याने तो संतुलित संघ आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील संघ सध्या नऊ सामन्यांतून सहा विजयांसह (12 गुण) आरामात गुणतालिकेत अव्वल स्थानी विसावलेला आहे. प्लेऑफसाठीची पात्रता निश्चित करण्याच्या दृष्टीने जादुई 16 गुणांचा टप्पा गाठण्यासाठी उर्वरित पाच सामन्यांपैकी फक्त दोन लढतींत विजय नोंदविण्याची त्यांना आवश्यकता आहे. घरच्या मैदानावर आज खेळत असल्याने आणि फॉर्ममधील वरच्या फळीमुळे गुजरातचा उत्साह वाढैल.

पाच अर्धशतकांसह 456 धावा काढून ऑरेंज कॅप राखलेला साई सुदर्शन हा त्यांचा उत्कृष्ट कामगिरी करणारा खेळाडू आहे. गिल (389 धावा) आणि जोस बटलर (406 धावा) हे देखील हंगामातील आघाडीच्या सात फलंदाजांमध्ये आहेत. गोलंदाजीच्या आघाडीवर प्रसिद्ध कृष्णाने माऱ्याचे प्रभावी नेतृत्व केले आहे. त्याने मोहम्मद सिराज आणि इशांत शर्मा यांच्यासोबत एक मजबूत वेगवान त्रिकूट तयार केलेले असून फिरकी विभागात रशिद खानचे फॉर्ममध्ये पुनरागमन ही त्यांच्यासाठी एक मदतकारी बाब आहे. याशिवाय वॉशिंग्टन सुंदरने चांगला आधार दिला आहे.

या हंगामाच्या सुऊवातीला झालेल्या परतीच्या सामन्यात गुजरातने हैदराबादमध्ये सनराझयर्सवर सात गड्यांनी विजय मिळवला होता, जो मोहम्मद सिराजच्या 17 धावांत 4 बळी मिळविणाऱ्या सनसनाटी स्पेलवर आधारित होता. एका महिन्यानंतर त्यांना पुन्हा एकदा विजय मिळविण्याची आशा असेल. दुसरीकडे, हैदराबाद अनिश्चित स्थितीत घसरले आहे आणि त्यांना विजय मिळवणे आवश्यक आहे. नऊ सामन्यांत त्यांनी फक्त तीन विजय मिळवले आहे आणि ते नवव्या स्थानावर घसरले आहेत. आणखी एक पराभव त्यांना प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर काढेल.

हैदराबादच्या मोहिमेत विशेषत: सलामीवीर अभिषेक शर्मा व ट्रॅव्हिस हेड यांनी अधूनमधून चमक दाखविली आहे, परंतु त्यांच्यात सातत्याचा अभाव आहे. त्यांच्या वरच्या फळीच्या अपयशांत अनेकदा कमकुवत मधल्या फळीची भर पडलेली आहे. मधल्या फळीतील हेनरिक क्लासेन, नितीशकुमार रे•ाr आणि इशान किशनसारखे खेळाडू फॉर्मसाठी संघर्ष करत आहेत. गोलंदाजीच्या बाबतीत हर्षल पटेल हा त्यांचा उत्कृष्ट कामगिरी करणारा खेळाडू आहे. तथापि, हैदराबादला पॅट कमिन्स आणि मोहम्मद शमी या अनुभवी जोडीकडून बरेच काही अपेक्षित असेल.

संघ

गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर, बी. साई सुदर्शन, शाहऊख खान, शेरफेन रदरफोर्ड, राहुल तेवतिया, रशिद खान, कागिसो रबाडा, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, इशांत शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, अनुज रावत, महिपाल लोमरोर, अर्शद खान, जयंत यादव, निशांत सिंधू, कुलवंत खेजरोलिया, जेराल्ड कोएत्झी, मानव सुतार, कुमार कुशाग्र, गुरनूर ब्रार आणि करिम जनात.

सनरायझर्स हैदराबाद : पॅट कमिन्स (कर्णधार), इशान किशन, अथर्व तायडे, अभिनव मनोहर, अनिकेत वर्मा, सचिन बेबी, स्मरण रविचंद्रन, हेनरिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड, हर्षल पटेल, कामिंदू मेंडिस, विआन मुल्डर, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रे•ाr, मोहम्मद शमी, राहुल चहर, सिमरजित सिंग, झीशान अन्सारी, जयदेव उनाडकट, ईशान मलिंगा.

सामन्याची वेळ : संध्या. 7.30 वा.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article