कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गुजरातची यूपी वॉरियर्सवर मात

06:45 AM Feb 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सामनावीर गार्डनरची अष्टपैलू चमक, प्रिया मिश्राचे 3 बळी, हरलीन-डॉटिनची उपयुक्त खेळी

Advertisement

वृत्तसंस्था/ वडोदरा

Advertisement

कर्णधार अॅश्ले गार्डनरच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर गुजरात जायंट्सने महिला प्रिमियर लीगमधील सामन्यात यूपी वॉरियर्सवर 6 गड्यानी सहज विजय मिळविला. गार्डनरने 39 धावांत दोन बळी मिळविल्यानंतर फलंदाजीत 32 चेंडूत 52 धावा फटकावत आपल्या संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. तिचे हे सलग दुसरे अर्धशतक आहे. या तिसऱ्या आवृत्तीतील त्यांचा हा पहिलाच विजय आहे. याआधी पहिल्या सामन्यात त्यांना आरसीबीकडून हा पत्करावी लागली होती.

गुजरातने प्रथम क्षेत्ररक्षण निवडल्यानंतर युवा स्पिनर प्रिया मिश्रा (25 धावांत 3 बळी), कर्णधार गार्डनर व दियांद्रा डॉटिन (2-34), काश्वी गौतम (1-15) यांनी शिस्तबद्ध मारा करीत यूपी वॉरियर्सला निर्धारित 20 षटकांत 9 बाद 143 धावांवर रोखले. या माफक आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातची स्थिती 2 बाद 22 अशी नाजूक बनली होती. पण गार्डनरने शानदार फलंदाजी करीत डाव सावरला आणि लॉरा वुलव्हार्टसमवेत 42 चेंडूत 55 धावांची भागीदारी केली. गार्डनरने क्रांती गौडला 2 चौकार लगावल्यानंतर पाचव्या षटकात सायमा ठाकोरला 2 षटकार ठोकत संघाला 6 षटकांत 2 बाद 42 अशी मजल मारून दिली. 12 व्या षटकांत तिला ताहलिया मॅकग्राने बाद केले तेव्हा तिने 5 चौकार, 3 षटकार मारले होते. नंतर हरलीन देओल (नाबाद 34) व डॉटिन (नाबाद 33) यांनी केवळ 37 चेंडूत 58 धावा फटकावत दोन षटके बाकी असताना गुजरातला विजय मिळवून दिला.

यूपी वॉरियर्सच्या डावात कर्णधार दीप्ती शर्माने सर्वाधिक 27 चेंडूत 39 धावा केल्या. उमा छेत्रीने 24, श्वेता सेहरावतने 16 यांनीही उपयुक्त योगदान दिले. अॅलाना किंग (19) व सायमा ठाकोर (15) यांनी अखेरच्या टप्प्यात फटकेबाजी करीत 13 चेंडूत 26 धावा फटकावल्याने त्यांना दीडशेच्या जवळपास मजल मारता आली. 11 व्या षटकांत 5 बाद 78 अशी चांगली स्थिती असताना गार्डनरने सनसनाटी झेल टिपत दीप्तीची खेळी संपुष्टात आणल्यानंतर 18 व्या षटकात त्यांची स्थिती 8 बाद 117 अशी झाली होती.

संक्षिप्त धावफलक : यूपी वॉरियर्स 20 षटकांत 9 बाद 143 : किरण नवगिरे 15, उमा छेत्री 24, दीप्ती शर्मा 39, सेहरावत 16, किंग नाबाद 19, सायमा ठाकोर 7 चेंडूत 15, डॉटिन 2-34, गार्डनर 2-39, प्रिया मिश्रा 3-25, गौतम 1-15. गुजरात जायंट्स 18 षटकांत 4 बाद 144 : वुलव्हार्ट 22, गार्डनर 32 चेंडूत 52, हरलीन 30 चेंडूत नाबाद 34, डॉटिन 18 चेंडूत नाबाद 33. सोफी एक्लेस्टोन 2-16, ग्रेस हॅरिस 1-1, मॅकग्रा 1-21.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article