महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दिल्लीतील शाळांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी

06:25 AM Aug 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कोचिंगमधील घटनेनंतर सरकारकडून उपाययोजना

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

दिल्लीतील कोचिंग दुर्घटनेदरम्यान विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून आम आदमी पक्षाच्या सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. दिल्लीतील सर्व शाळांसाठी ही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आल्याचे मंत्री आतिशी यांनी स्पष्ट केले. नव्या निर्देशांमध्ये तळघराच्या वापरासंबंधी महत्त्वपूर्ण सूचना करण्यात आल्या आहेत. यासोबतच विद्युत तारांची नियमित तपासणी करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

राजेंद्र नगरमध्ये कोचिंगच्या अपघातात तीन विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला होता. यानंतर अवैधपणे सुरू असलेल्या क्लासेसवर सील करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर आता शाळांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. आतापर्यंत दिल्लीतील 30 कोचिंग सेंटर्सची तळघर सील करण्यात आली आहेत. याशिवाय एमसीडीने 200 कोचिंग संस्थांना नोटीस पाठवली आहे. तसेच अतिक्रमणावर बुलडोझरची कारवाई करण्यात आली आहे.

शाळांसाठी जारी करण्यात आलेल्या निर्देशांमध्ये महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, बेसमेंटच्या वापराबाबत मास्टर प्लॅन 2021 मधील तरतुदींचे पालन केले पाहिजे, असे सुचविण्यात आले आहे. शाळेमध्ये तळघर असल्यास मास्टर प्लॅननुसार परवानगी असलेले उपक्रमच राबवावेत. शाळेच्या इमारतीचे सर्व दरवाजे प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी कार्यरत स्थितीत असावेत.  तळघराकडे जाणारा मार्ग शाळेच्या निर्वासन योजनेमध्ये योग्यरित्या चिन्हांकित केलेला असावा, असेही सांगण्यात आले आहे.

शाळेच्या मार्गिका आणि पायऱ्यांमध्ये पाणी साचत नाही ना याची नियमितपणे तपासणी केली पाहिजे आणि त्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जावीत. शाळेच्या आजूबाजूला कुठेही पाणी साचणार नाही, यासाठी शालेय स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. इलेक्ट्रिकल वायरिंग आणि फिटिंग्ज इत्यादी तपासल्या पाहिजेत आणि कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून सर्व मानकांचे योग्य पालन केले जावे. तसेच शाळेमध्ये आवश्यक अग्निसुरक्षा उपाय असावेत, असेही सांगण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article