For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उचगाव केडीपी बैठकीत विविध योजनाविषयी मार्गदर्शन

10:35 AM Jul 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
उचगाव केडीपी बैठकीत विविध योजनाविषयी मार्गदर्शन
Advertisement

विविध खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती : सरकारच्या योजना पोहोचविल्या सामान्यांपर्यंत

Advertisement

वार्ताहर /उचगाव

शासनाच्या विविध खात्यातील विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. यासाठीच येथे अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून सरकारमार्फत मंजूर झालेल्या योजनांची माहिती तात्काळ ग्रामपंचायतमध्ये देण्यात यावी, तरच खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल, असे उद्गार उचगाव ग्रामपंचायत येथे घेण्यात आलेल्या केडीपी बैठकीमध्ये उचगाव ग्राम. पं. उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे यांनी काढले. अध्यक्षस्थानी अध्यक्षा मथुरा तेरसे होत्या. सेव्रेटरी सुमेरा मोकाशी यांनी प्रास्ताविक केले. पीडीओ शिवाजी मडिवाळ यांनी विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांचे उचगाव ग्राम. पं. तर्फे स्वागत केले.

Advertisement

अधिकाऱ्यांनी दिली माहिती

कृषी खाते, पशुवैद्यकीय खाते, हेस्कॉम, बागायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळा, अंगणवाडी, आशा कार्यकर्त्या, के. व्ही. जी. बँक अशा विविध खात्याच्या उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी आपापल्या खात्याविषयी सविस्तर माहिती सांगितली. व सरकारमार्फत दिल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. हेस्कॉमचे सचिन म्हणाले की, सध्या कृषी विभागामध्ये असलेले पंपसेट सर्व शेतकऱ्यांनी आधार लिंक करणे गरजेचे आहे. ज्यांच्या नावावर वीजमोटर आहेत त्या मालकाचे निधन झाल्यास तात्काळ वारसा करून ते वारसाच्या नावावर करून घेणे. पशु वैद्यकीय खात्यातर्फे डॉ. एल्गार म्हणाले की, सध्या परिसरामध्ये लम्पी व एल. आर. जी. रोगांची साथ सुरू आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या जनावरांना लवकरात लवकर लस द्यावी. डॉ. स्मिता गोडसे यांनी सध्या पावसाळा सुरू असल्याने डेंग्यू, मलेरिया रोगाची लागण होत आहे. तरी सर्वांनी गरम पाणी, ताजा व पोषक आहार व स्वच्छता याकडे लक्ष द्यावे. आजाराची लक्षणे आढळल्यास तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन तपासणी करून औषधोपचार घ्यावेत. कृषी खात्यातर्फे मलेशी यांनी योजनांविषयी माहिती सांगितली. के. व्ही. जी. बँकतर्फे आलेल्या विविध योजना व त्यावर मिळणारी सूट याविषयी सविस्तर माहिती दिली. अंगणवाडीचे अधिकारी ए. एस. पाटील यांनी महिलांना मिळणाऱ्या योजनांविषयी माहिती सांगितली. ग्रामपंचायत सदस्यांनी आपापले प्रŽ विचारून शंका निरसन करून घेतले.बैठकीमध्ये पंचायत सदस्य एल. डी. चौगुले, बंटी पावशे, यादो कांबळे, मोनाप्पा पाटील, गजानन नाईक, सूरज सुतार, जावेद जमादार आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी कार्यकर्त्या व ग्राम. पं. कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.