For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दुर्गामाता दौड आयोजनाबाबत बैठकीत मार्गदर्शन

11:13 AM Sep 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
दुर्गामाता दौड आयोजनाबाबत बैठकीत मार्गदर्शन
Advertisement

बेळगाव : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगाववतीने श्री दुर्गामाता दौड घटस्थापना ते विजयादशमी यादरम्यान काढण्यात येणार आहे. दौडीच्या नियोजनासंदर्भात रविवारी माऊती मंदिर, माऊती गल्ली येथे धारकरी व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यात संपूर्ण कर्नाटकात यावर्षी श्री दुर्गामाता दौड सुरू करण्यात यावी, यासाठी जिल्हानिहाय धारकऱ्यांची नियुक्ती करून प्रचारक नेमण्यात आले. बेळगाव शहर विभाग व तालुका विभागात उत्स्फूर्तपणे दौड होते, ती शिस्तबद्ध तसेच वेळेत पहाटे 5.45 वाजता सुरू करावी, असे आवाहन करण्यात आले.

Advertisement

श्री दुर्गामाता दौड 3 ते 12 ऑक्टोबर यादरम्यान होणार आहे. नियमांचे पालन करण्याबाबत कर्नाटक प्रांतप्रमुख किरण गावडे यांनी धारकऱ्यांना मार्गदर्शन केले. तालुका विभागात ध्वज वितरण रविवार दि. 29 सप्टेंबर रोजी दुपारी 4.30 वाजता माऊती मंदिर, माऊती गल्ली येथे करण्यात येणार आहे. या बैठकीला जिल्हाप्रमुख विश्वनाथ पाटील, शहरप्रमुख आनंद चौगुले, तालुकाप्रमुख परशुराम कोकितकर, कार्यवाह कल्लाप्पा पाटील, चंद्रकांत चौगुले, प्रमोद चौगुले, तसेच तालुका व शहर विभागांचे प्रमुख धारकरी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.