वास्को शहरात गुढीपाडवा उत्साहात
हिंदू नववर्ष स्वागत समिती, शिवशंभू प्रतिष्ठानतर्फे दिंडी, शोभायात्रेचे आयोजन
वास्को : हिंदू नववर्ष स्वागत समिती व शिवशंभू प्रतिष्ठान संभाजी नगर मुरगाव यांनी वर्ष पध्दतीप्रमाणे यंदाही वास्को शहरात दिंडी व शोभायात्रा काढून तसेच हिंदू जागृती सभा असे कार्यक्रम आयोजित करून गुढीपाडवा उत्साहात साजरा केला. मुरगाव पालिका इमारतीसमोर झालेल्या सभेने या उत्सवाची सांगता करण्यात आली. गुढीपाडवा नववर्ष उत्सवात आमदार दाजी साळकर, आमदार संकल्प आमोणकर, मुरगावचे नगराध्यक्ष गिराश बोरकर, नगरसेवक विनोद किनळेकर, अमेय चोपडेकर, श्रध्दा आमोणकर, क्षमी साळकर सहभागी झाल्या होत्या. सकाळी दामोदर मंदिरात श्री चरणी प्रार्थना करून या वार्षीक उत्सवाला प्रारंभ करण्यात आला. दामोदर मंदिराकडून शोभायात्रेला प्रारंभ करण्यात आला. यात माहिला मोठ्या संख्येने पारंपरीक वेशभुषेत सहभागी झाल्या होत्या. शोभायात्रेत त्यांनी संगीताच्या तालावर पारंपरीक कलाविष्कार सादर केले.
रामरथासमोर बाबू गडेकर व सहकलाकारांची दिंडीही होती. शोभायात्रा व दिंडीने नववर्ष स्वागताची शोभा वाढवली. शोभायात्र व दिंडीने श्री दामोदर मंदिराला वळसा घालून स्वातंत्र्यपथ मार्गावरून मुरगाव पालिका इमारतीसमोर आल्यानंतर त्याचे सभेत ऊपांतर झाले. सभेत व्यासपीठावर आमदार संकल्प आमोणकर, आमदार दाजी साळकर, नगरसेवक विनोद किनळेकर, अमेय चोपडेकर, श्रध्दा आमोणकर, नववर्ष उत्सव समितीचे अध्यक्ष संजय नाईक, सभेचे प्रमुख पाहुणे साहित्यिक मोतीलाल पेडणेकर, प्रमुख वक्ते आंतराष्ट्रीय बजरंग दलाचे संस्थापक दिनेश पाटील, उत्सव समितीचे पदाधिकारी नितीन फळदेसाई, साईनाथ नाईक उपस्थित होते. या कार्यक्रमात पत्रकार मिलिंद काकोडकर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रमुख वक्ते दिनेश पाटील यांच्यासह व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांनी या सभेला संबोधीत केले. संजय नाईक यांनी स्वागत केले. नितीन फळदेसाई यांनी प्रास्तावीक केले. ज्योती बांदोडकर यांनी सूत्रसंचालन केले.