For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिरण्यकेशीला पालकमंत्र्यांनी दिली भेट

11:27 AM May 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
हिरण्यकेशीला पालकमंत्र्यांनी दिली भेट
Advertisement

पात्रातील भराव हटवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आज सूचना करणार 

Advertisement

संकेश्वर : गत पंधरावड्यापासून वळीव पावसाने हजेरी लावल्यामुळे सर्वत्रच पाणीच पाणी झाले आहे. रविवारीही दिवसभर पावसाने मुसळधार हजेरी लावल्याने हिरण्यकेशीला आगामी काळात पूरपरिस्थिती प्राप्त होणार या अंदाजापोटी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी संकेश्वरला भेट देऊन हिरण्यकेशी नदीची पाहणी केली. नदीपात्रातील मातीचे भरव हटवण्यात आले नसल्याचे त्याच्या निदर्शनास येताच संबंधित अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणाबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. राष्ट्रीय महामार्ग रुंदीकरणासाठी हिरण्यकेशीनदी पात्रावरील उड्डाणपुलाखाली दोन पात्राच्या मध्यभागी माती व मुरूमाचे भराव टाकून वाहतुकीसाठी मार्ग करण्यात आला होता. वास्तविक रुंदीकरणाचे काम संपल्यावर मातीचे भराला पात्रातून हटवायाल पाहिजे हवे होते. पण गत पावसाळी हंगामापासून आजतागायत मातीचे भराव हटवण्यात आले नाहीत. यामुळे गेल्या हंगामात मातीच्या भरावामुळे नदी पात्रातील पाणी मोठ्या प्रमाणाला भीमनगर नदी गल्ली, पिंजार गल्ली व मठ गल्ली भागातील लोकवसतीच टिकले होते.

महापुरामुळे लोक सैराबरा पळू लागले होते.सध्या वळीव पावसाने सातत्याने हजेरी लावल्यामुळे उंबरठ्यावर पोहचलेल्या पावसाची हंगामात पुन्हा हिरण्यकेशीला महापुराच्या धक्का प्राप्त होणार या विचाराने पूर्व नियोजन म्हणून पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी रविवारी संकेश्वरला धावती भेट देऊन हिरण्यकेशीची पाहणी केली असता नदीपात्रात मातीचे भराव जैसे थे असल्याचे त्यांना आढळून आले. या परिस्थितीचे गांभीर्य घेऊन सोमवारी तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन हिरण्यकेशी नदीतील मातीचे भराव हटवण्यासाठी खास सूचना देणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. या भेटी दरम्यान वीरशैव समाजाचे अध्यक्ष आण्णासाहेब शिरकोळी यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीचे चौकशी केली. याप्रसंगी बुडाचे अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, माजी नगराध्यक्ष अमर नलवडे, श्रीकांत इत्तनुरी, संकेश्वर ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष संतोष मुडशी, नगरसेवक अविनाश तान्वडे, अजित करनशी आदी मान्यवर नेते उपस्थित होते.

Advertisement

मराठा समाज कार्यकर्त्यांशी केली चर्चा 

पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी संकेश्वर येथील विश्रामगृहात मराठा समाजाच्या विविध समस्या संदर्भात समाजाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. शहरातील रस्त्याची समस्या सोडवावी अशी मागणी यावेळी केली. चन्नगीत तालुक्यातील होदीगेंरी येथे शहाजी महाराज समाधीचा विकास करण्यासाठी 5 कोटींचा निधी मंजूर केल्याबद्दल  जारकीहोळी यांचा मराठा समाजातर्फे अभिनंदनपर. सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मराठा समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.