पालकमंत्र्यांनी टोचले कान : महसूलची पळापळ
सांगली / शितलनाथ चौगुले :
पूरग्रस्त वसाहत शिवाजीनगरवासियांची बैठक बुधवारी पार पडली. पालकमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर महसूलकडून या बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. भिलवडी मंडल अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीस शिवाजीनगरवासिय मोठया संख्येने हजर होते. यावेळी प्लॉ टधारक व समितीकडून विविध मुद्दे उपस्थित करण्यात आले. यावर सकारात्मक चर्चा करण्यात आली. १९८५ साली भिलवडी येथील पूरबाधितांना शासनाकडून प्लॉ टचे वाटप करण्यात आले होते. पूरापासून संरक्षण मिळावे यासाठी या नविन वसाहतची निर्मिती भिलवडी ग्रामपंचायत अंतर्गत करण्यात आली. कालांतराने ही वसाहत माळवाडी ग्रामपंचायतकडे वर्ग करण्यात आली. तत्कालीन पालक तथा महसूलमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी शिवाजीनगर प्लॉटधारकांच्या मागणीनुसार प्लॉट विक्री संदर्भात आदेश काढून दंडाची रक्कम नाममात्र केली होती. शिवाजीनगर येथील प्लॉट वर्ग दोन मध्ये येतात वर्ग दोन मधील सदरहू अंदाजे ३०० ते ४०० प्लॉट वर्ग एक करण्यासंदर्भात महसूल विभागाकडून सूचना देण्यात आल्या. शिवाजीनगरवासियांनी दंड भरण्याची तयारी दर्शवली. एकत्र येत एक समिती स्थापन केली. तद्नंतर ७ मार्च २०२४ अखेर अंदाजे ३८५ प्लॉटधारकांनी कागदपत्रे जोडून समितीच्यावतीने प्रस्ताव सादर केले. परंतू प्रस्ताव गेली दीड वर्षे धुळखात पडून आहेत. यातील काही प्लॉ टधारकांनी नोटीस प्राप्त झालेनंतर दंडही भरला. गेल्या दीड वर्षाच्या कालावधीत अनेकजण कागदपत्रे, फायली घेवून महसूल विभागाकडे खेटे घालत आहेत शासनाला यातून अंदाजे दीड कोटी महसूल प्राप्त होणार आहे. परंतू कागदपत्रे, अटीशर्ती, नियमभंग यात फायलींचे भिजत घोंगडे पडले आहे. यासंदर्भात समितीने सातत्याने पाठपुरावा आजअखेर चालू ठेवला आहे. कागदपत्रांची पूर्तता करणे व पुन्हा पाठपुरावा करणे हे अविरतपणे चालू आहे. २३ ऑ गरट रोजी पालकमंत्री पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी भिलवडी दौऱ्यावर आले होते. त्यांना यासंदर्भात दाखल प्रस्ताव व सद्यस्थितीबाबत निवेदन देण्यात आले. पालकमंत्र्यांनी दखल घेत याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.
- दंड भरुनही अद्याप वर्ग दोनच
महसूलकडून प्राप्त चलन नोटीसीद्वारे काही प्लॉटधारकांनी दंड भरला. याची एक प्रत महसूलकडे जमा करण्यात आली. पण तरीही सातबारावर वर्ग दोन अथवा नविन शर्त असा उल्लेख असल्याचे प्लॉटधारकांनी मंडल अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. याबाबत चर्चा होवून दंड भरलेली पावती व चलन याची सत्यप्रत महसूलकडे सादर करावी