For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सब जगह कमल खिलेगा !

07:20 PM Dec 01, 2025 IST | अनुजा कुडतरकर
सब जगह कमल खिलेगा
Advertisement

सावंतवाडी वार्ताहर

Advertisement

सावंतवाडी, वेंगुर्ले ,मालवण या तिन्ही नगरपालिका आणि कणकवली नगरपंचायतमध्ये भाजपला जनता साथ देईल. विकासासाठी भाजपच आवश्यक आहे हे आता जनतेला कळले आहे. त्यामुळे जनतेचे आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत असे पालकमंत्री नितेश राणे यांनी सावंतवाडी येथील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले . राजघराण्याने जनतेची सेवा पूर्वीही केली आहे .आता यापुढेही राजघराणे जनतेची सेवा करण्यास सज्ज आहे. आता फक्त जनतेने राजघराण्याला साथ द्या असे ते म्हणाले.पाच वर्षात सावंतवाडी शहराचा चेहरा मोहरा आम्ही बदलू. जनतेने आम्हाला सेवा करण्याची संधी द्यावी. राजघराण्याने आपल्याला भरभरून दिले आहे त्यांची परतफेड करण्याची वेळ आता जनतेची आहे.

विकास निधी देण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांनाच

Advertisement

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः मुख्यमंत्री राहिले आहेत. प्रत्येक फाईल शेवटी मुख्यमंत्र्यांच्या सहीनेच मंजूर होते हे त्यांनाही माहिती आहे. दूसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परवाच एका ठिकाणी म्हटले की अर्थमंत्री असलो तरी निधीचे निर्णय मुख्यमंत्री घेतात. हे जाहीर केलंय. त्यामुळे सबकुछ देवा भाऊच असतील . जनता सुज्ञ आहे त्यामुळे विकासाच्या मुद्द्यावर भाजपचाच विजय होईल, 'सब जगह कमल खिलेगा ', असा विश्वास राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी व्यक्त केला. यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोंसले, भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. श्रद्धाराजे भोंसले आदी उपस्थित होते.ते म्हणाले, सावंतवाडी शहराच्या पूढील ५ वर्षांच्या विकासासाठी आम्ही सावंतवाडीकर नागरीकांची मतरूपी साथ व आशीर्वाद मागितला. ज्या राजघराण्यानं शहराला ओळख दिली, अनेक प्रकल्प राबवले त्या राजघराण्याचे ऋण फेडण्यासाठी ही संधी आहे. कारण श्रद्धाराजे भोंसले यांना मतदान म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना मतदान आहे. पालकमंत्री म्हणून मी त्यांच्या सोबतच आहे. त्यामुळे श्रद्धाराजेंसह आमच्या भाजपच्या संपूर्ण पॅनलला सावंतवाडीकर मतदारांनी निवडून दिल्यास या शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कोणताही निधी कमू पडू देणार नाही, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.आज केंद्रात व राज्यात भाजपचीच सत्ता आहे. राज्यात मुख्यमंत्री आमचेच आहेत. मी स्वतः पालकमंत्री आहे. त्यामुळे शहरांच्या विकासासाठी निधी आम्हीच उपलब्ध करून देणार आहोत. लखमराजे यांनी परवाच्या पत्रकार परिषदेत आम्ही स्थानिक आमदार दीपक केसरकर यांना सोबत घेऊन विकास करणार असल्याचे म्हटले आहे. आम्हाला राजकारण करायचे नाही.त्यामुळे चारही शहरांचा जास्तीतजास्त विकास करण्याचा आमचा हेतू आहे. वैयक्तीक उणी धुणी, हेवेदावे काढण्याची ही निवडणूक नाही‌‌, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राजघराण्याने सावंतवाडीला सुंदरवाडी बनवलं. रस्ते, पाणी, मोती तलाव शहाराला कुणी दिला. इथली आरोग्य व्यवस्था, ड्रेनेज सिस्टीम, शैक्षणिक सुविधा या त्यावेळी राजघराण्यानं कोणतीही अपेक्षा न ठेवता हे सर्व दिलं. त्यांची ती दुरदृष्टी होती. आता त्यांच्याच कुटुंबातील एका सदस्याने प्रत्यक्ष निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे ही वेळ परतफेड करण्याची आहे. खर तर स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी त्या चष्म्यातून ही निवडणूक पाहायला हवी होती. राजघराणं विकासाची जबाबदारी घेत असेल तर त्याला सत्तेची जोडं देण आवश्यक आहे‌. मात्र ते जरी जाहिरपणे काहीही सांगत असले तरीही आ. दीपक केसरकर यांचा आशीर्वाद श्रद्धा सावंत भोसले यांना आहे‌, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.आमच्या पॅनलमध्ये कोणाही चुकीच्या माणसाला तिकीट दिलेलं नाही. कुणाला चुकीच्या पद्धतीने केसमध्ये गुंतवल जात असेल तर त्यावर एफिडेव्हीट झालंय. देशात, राज्यात डॉ. बाबासाहेबांचं संविधान चालतं. त्यामुळे केवळ आरोप करून चालत नाही, पुरावे द्यावे लागतात. मी पालकमंत्री आहे, त्यामुळे तसं चुकीचं करण्याची कुणाची हिंमत नाही. चाबुक खिशातच असतो, असेही त्यांनी स्पष्ट केलं.

Advertisement
Tags :

.