Sangli : पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज सांगली दौऱ्यावर
तासगाव आणि पलूस येथे कार्यकर्ता संवाद
सांगली : पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे शुक्रवार, दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा कार्यक्रम असा आहे. शुक्रवारी ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ५.३५ वाजता महालक्ष्मी एक्स्प्रेसने मिरज रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय विश्रामगृह मिरजकडे प्रयाण. सकाळी १०.३० वाजता हॉटेल ककुन, आमराई रोड, येथे आगमन व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर व महाराष्ट्र विभाग सांगली मधील सर्व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य व जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संघटना याच्यावतीने आयोजित नवनिर्वाचित अध्यक्ष रविंद्र माणगांव यांच्या सत्कार समारंभास उपस्थिती.
सकाळी ११.१५ वाजता तासगावकडे प्रयाण.सकाळी ११.५५ वाजता दत्त मंदिरासमोर, तासगाव-येथे आगमन व भाजपा जनसंपर्क कार्यालय उद्घाटन आणि भाजपा कार्यकर्ता स्नेहमेळावा व पदाधिकारी नियुक्ती पत्र वाटप कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी १.३० वाजता गणपती मंदिर भाजपा तासगाव शहर मंडल नुतन कार्यालयाचे उद्घाटन. दुपारी २ वाजता जय तुळजाभवानी नगर, भिवघाट रोड, तासगाव येथे अॅड. स्वप्नील पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर कोल्हापूरला रवाना होणार पलूस येथील गुंडा दाजी कॉम्प्लेक्स शेजारी भाजपा कार्यालयाच्या सायंकाळी ते उपस्थित राहणार आहेत.
धोंडीराज महाराजांच्या दर्शन झाल्यानंतर सायंकाळी पलूस येथे पक्षप्रवेश व कार्यकर्ता संवाद मेळाव्यास उपस्थिती. रात्री सर्जेराव अण्णा नलवडे यांच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर ते कोल्हापूरला रवाना होणार आहेत. उद्घाटनासाठी सायंकाळी ते उपस्थित राहणार आहेत. धोंडीराज महाराजांच्या दर्शन झाल्यानंतर सायंकाळी पलूस येथे पक्षप्रवेश व कार्यकर्ता संवाद मेळाव्यास उपस्थिती. रात्री सर्जेराव अण्णा नलवडे यांच्या निवासस्थानी भेट विल्यानंतर ते कोल्हापूरला रवाना होणार आहेत.