For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंतप्रधान मोदींना रशियात ‘गार्ड ऑफ ऑनर’

06:58 AM Jul 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
पंतप्रधान मोदींना रशियात ‘गार्ड ऑफ ऑनर’
Advertisement

दोन दिवसांच्या दौऱ्यावर दाखल : पुतिन यांच्यासोबत खासगी डिनर; नवीन व्यापारी मार्गांवर चर्चा होणार

Advertisement

वृत्तसंस्था/ मॉस्को

भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 वर्षानंतर रशियाला पोहोचले आहेत. मॉस्को येथील वनुकोवो-2 आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे गार्ड ऑफ ऑनरने स्वागत करण्यात आले. पंतप्रधानांनी आपल्या या दोन दिवसांच्या रशिया भेटीदरम्यान राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासोबत खासगी डिनरही घेतले. आता मंगळवारी भारत आणि रशिया यांच्यात नवे स्नेहबंध दृढ होताना अनेक करारांना मूर्त स्वरुप मिळणार आहे. पंतप्रधान मोदी आपल्या दोन दिवशीय दौऱ्यात 22व्या भारत-रशिया वार्षिक परिषदेत सहभागी होणार आहेत. तसेच मोदी आणि पुतिन हे दोन्ही नेते परस्पर हितसंबंधांच्या प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवरही आपले विचार मांडतील. रशियाचा दौरा संपल्यानंतर मोदी ऑस्ट्रियाला रवाना होतील.

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यावर रशियाची राजधानी मॉस्को येथे पोहोचले आहेत. पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यात भारत आणि रशियादरम्यान अनेक महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या होणार आहेत. यामध्ये संरक्षण आणि ऊर्जा क्षेत्राशी संबंधित करार महत्त्वाचे ठरणार आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या निमंत्रणावरून मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यावर दाखल झाले आहेत. रशियामध्ये दाखल झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ‘एक्स’वर एक पोस्ट करत “मी मॉस्कोला पोहोचलो आहे. दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत होईल, अशी अपेक्षा आहे. रशिया आणि मॉस्को यांच्यातील मजबूत संबंधांचा फायदा दोन्ही देशांच्या लोकांना होणार आहे.” असा संदेश भारतीयांना दिला आहे. मोदी कार्लटन हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर भारतीय समुदायाच्या लोकांनी त्यांचे तिरंगे ध्वज दाखवत स्वागत केले. येथे त्यांच्या स्वागतासाठी भारतीय समुदायाचे लोक तिरंगा घेऊन उभे होते. पंतप्रधानांनी हस्तांदोलन करून त्यांचे अभिवादन स्वीकारले. अनेक भारतीय प्रवासी पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी हॉटेलबाहेर उभे होते.

युव्रेन युद्धानंतर पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच रशियाला भेट देत आहेत. यापूर्वी तो 2019 मध्ये रशियाला गेले होते. त्यानंतर 20 व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी ते व्लादिवोस्तोक येथे गेले. मोदी आणि व्लादिमीर पुतिन यांची शेवटची भेट 2022 मध्ये उझबेकिस्तानची राजधानी समरकंद येथे एससीओ शिखर परिषदेदरम्यान झाली होती. 2023 मध्ये भारतात झालेल्या जी-20 परिषदेसाठी पुतिन आले नव्हते.

व्यापारविषयक बोलणी होणार

युव्रेन युद्धानंतर भारत आणि रशियामधील व्यापार झपाट्याने वाढला आहे. यामध्ये भारताकडून कच्च्या तेलाची खरेदी केली जात आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात भारताने 45.4 लाख कोटी ऊपयांचे कच्चे तेल खरेदी केले होते. 2023-24 या आर्थिक वर्षात दोन्ही देशांमध्ये 54 लाख कोटी ऊपयांचा व्यापार झाला होता. यामध्ये भारताने रशियाला केवळ 3.3 लाख कोटी ऊपयांची निर्यात केली. दोन्ही देशांमध्ये मोठ्या प्रमाणात व्यापार होत असून हा ओघ वाढवण्यासंबंधी मोदी आणि पुतिन यांच्यात महत्त्वपूर्ण बोलणी व करार होणार असल्याची माहिती देण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेणार आहेत. यासोबतच मंगळवारी ते प्रवासी भारतीयांशीही चर्चा करणार आहेत. पंतप्रधान भारतीय विद्यार्थ्यांनाही भेटणार आहेत. यावेळी मॉस्को येथील केंद्रीय विद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. 70-100 विद्यार्थी तिरंगा ध्वज घेऊन पंतप्रधानांचे स्वागत करतील, असे सांगण्यात येत आहे. पंतप्रधान त्यांच्याशीही बोलणार आहेत. रशियातील भारताचे राजदूत विनय कुमार यांनी मोदींच्या दोन दिवसीय रशिया दौऱ्याचे वर्णन ‘अत्यंत महत्त्वाचे’ असे केले आहे.

Advertisement
Tags :

.