For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ग्वाडा-निगेटिव्ह... सर्वात दुर्लभ रक्तगट

06:41 AM Jul 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
ग्वाडा निगेटिव्ह    सर्वात दुर्लभ रक्तगट
Advertisement

ग्वाडेलूपच्या महिलेत 48 वा रक्तसमूह

Advertisement

फ्रान्सच्या वैज्ञानिकांनी लावलेल्या एका शोधामुळे वैद्यकीय जगत चकित झाले आहे. एका सामान्य रक्ततपासणीदरम्यान ग्वाडेलूपच्या एका 68 वर्षीय महिलेत जगातील सर्वात दुर्लभ रक्तसमूह आढळून आला आहे, याला ग्वाडा नेगेटिव्ह नाव देण्यात आले आहे.

हा रक्तगट इतका अनोखा आहे की, हा जगात केवळ एका व्यक्तीत आढळून आला आहे. ही व्यक्ती अन्य कुणा रक्तदात्याकडून रक्त घेऊ शकत नाही, कारण तिचे रक्त कुण्या अन्य रक्तसमुहाशी मिळणारे नाही. या शोधाला इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ब्लड ट्रान्सफ्यूजनने जून 2025 मध्ये अधिकृतपणे 48 वा रक्तसमूह म्हणून मान्यता दिली.

Advertisement

ग्वाडा नेगेटिव्ह रक्तसमुहाचा शोध

2011 मध्ये ग्वाडेलूपची एक 54 वर्षीय महिला तेव्हा पॅरिस येथे राहत होती, ती शस्त्रक्रियेपूर्वी नियमित तपासणीसाठी आली होती. तपासणीदरम्यान डॉक्टरांना तिच्या रक्तात एक असामान्य अँटीबॉडी आढळून आली, जी कुठल्याही रक्तसमुहाशी जुळणारी नव्हती. त्या काळातील तांत्रिक मर्यादांमुळे या रहस्याची उकल होणे शक्य नव्हते.

2019 मध्ये नव्या पिढीच्या डीएनए सीक्वेंसिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने वैज्ञानिकांनी या महिलेच्या रक्ताचे पुन्हा विश्लेषण केले, महिलेच्या रक्तात विशेष जीन ज्याला पिग्झ म्हटले जाते, त्यात एक उत्परिवर्तन झाले आहे. हा जीन एक एंझाइम तयार करतो, जो लाल रक्तपेशींच्या पृष्ठभागावर विशेष प्रकारच्या शर्करेला (शुगर मॉलेक्युल)ला जोडतो. या शर्करेच्या अनुपस्थितीमुळे महिलेच्या रक्तात ईएमएम एंटीजन (जे जवळपास सर्व मनुष्यांमध्ये आढळते) नव्हते. या अनोख्या बदलामुळे एक नवा रक्तसमूह तयार झाला, ज्याला ईएमएम-निगेटिव्ह किंवा ग्वाडा निगेटिव्ह नाव देण्यात आले.

ग्वाडा निगेटिव्हची वैशिष्ट्यो...

ईएमए एंटीजनची अनुपस्थिती : ग्वाडा निगेटिव्ह रक्तसमुहाचे सर्वात मोठे वैशिष्ट्या म्हणजे यात ईएमएम एंटीजन नसते, जो सामान्य स्वरुपात सर्व लोकांच्या रेड ब्लड सेल्समध्ये असतो, याचमुळे हा रक्तगट अत्यंत दुर्लभ ठरतो.

कुठलाच मॅच नाही : ही महिला जगात एकमेव अशी व्यक्ती आहे, जिचे रक्त केवळ स्वत:च्याच रक्ताशी मॅच होते. म्हणजेच तिला रक्ताची आवश्यकता भासल्यास कुणी अन्य रक्तदाता तिला मदत करू शकत नाही. कारण अन्य सर्व रक्त ईएमए पॉझिटिव्ह असतील. जे तिच्या शरीरात गंभीर प्रतिरक्षा प्रतिक्रिया निर्माण करू शकतात.

जेनेटिक म्युटेशन : हे रक्तसमूह महिलेला स्वत:च्या आईवडिलांकडून वारशादाखल मिळाले आहे. ज्यातील प्रत्येकाकडे या बदललेल्या जीनची एक कॉपी होती.

चिकित्सीय प्रभाव : या महिलेला सौम्य बौद्धिक अक्षमता आहे, तिने दोन मुलांना प्रसूतीवेळीच गमावले होते. या समस्या पिग्झ जीनमध्ये उत्परिवर्तनाशी संबंधित असू शकतात असे वैज्ञानिकांचे मानणे आहे.

संशोधनाचे महत्त्व

ग्वाडा निगेटिव्हचा शोध केवळ वैज्ञानिक जिज्ञासा नसून याचा चिकित्सेच्या क्षेत्रात व्यापक प्रभाव आहे. हा शोध आम्हाला अनेक गोष्टी शिकविणारा आहे....

ब्लड ट्रान्सफ्यूजनात सुरक्षा : दुर्लभ रक्तसमुहांची ओळख पटविणे ब्लड ट्रान्सफ्युझनला सुरक्षित करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. जर या महिलेला चुकीचे रक्त चढविण्यात आले असते तर तिचे शरीर तीव्र प्रतिक्रिया देऊ लागले असते. यामुळे गंभीर जटिलता निर्माण झाल्या असत्या.

दुर्लभ रक्तदाता रजिस्ट्री : या संशोधनाने आंतरराष्ट्रीय दुर्लभ रक्तदाता रजिस्ट्रींच्या महत्त्वाला अधोरेखित केले आहे. जे आपत्कालीन स्थितीत जीवन रक्षक सहाय्य प्रदान करू शकतात.

भविष्यातील शक्यता : वैज्ञानिक आता स्टेम पेशींपासून लाल रक्त पेशी विकसित करण्यावर काम करत आहेत, ज्यांना जेनेटिक स्वरुपात संशोधित करत दुर्लभ रक्तसमूह म्हणजेच ग्वाडा निगेटिव्हशी मॅच करण्यासाठी तयार केले जाऊ शकते.

Advertisement
Tags :

.