For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

‘गुड मॉर्निंग’साठी जीएसटीचे ‘एप्रिल फूल’

06:22 AM Mar 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘गुड मॉर्निंग’साठी जीएसटीचे ‘एप्रिल फूल’

मेसेज पाठवल्यावर 18 टक्के कर आकारण्यासंबंधीची फेक पोस्ट व्हायरल

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सोशल मीडियावर कोणतीही माहिती पसरायला वेळ लागत नाही, विशेषत: ती दिशाभूल करणारी किंवा खोटी असेल तर ती वणव्यासारखी व्हायरल होते. आताही आर्थिक वर्षाच्या अखेरीस सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत असून त्यामध्ये ‘गुड मॉर्निंग’ मेसेज पाठवण्यावर 18 टक्के जीएसटी लागू होईल, असा दावा करण्यात आला आहे. एप्रिल महिन्यापासून हा नियम लागू होणार असून मोबाईल बिलासह ते भरावे लागणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. परंतु या दाव्याबाबत सखोल चौकशी केली असता 2018 मध्ये एका हिंदी वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या बातमीचे कटिंग शेअर केले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Advertisement

डी. सी. उपाध्याय नावाच्या युजरने 16 मार्च रोजी फेसबुकवर ही पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट शेअर करताना, ‘गुड मॉर्निंग संदेश थांबवा!’ अशी कॅप्शन देण्यात आली होती. या पोस्टमध्ये दिसत असलेल्या वृत्तपत्रातील कटिंगमध्ये ‘जर तुम्ही तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना आणि परिचितांना सुप्रभात संदेश पाठवत असाल तर सावध राहा. नवीन आर्थिक वर्षात हे तुमच्या खिशाला भारी पडणार आहे. 1 एप्रिलपासून सरकार पाठवलेल्या गुड मॉर्निंग मेसेजवर कर लावणार आहे. जीएसटीच्या धर्तीवर तो गुड मॉर्निंग टॅक्स म्हणून वसूल केला जाईल’ असे  लिहिले आहे. वृत्तपत्राच्या कटिंगमध्ये आणखी काही गोष्टी तपशीलवार लिहिल्या आहेत.

Advertisement

2 मार्च 2018 रोजी दिल्लीतून प्रकाशित झालेल्या वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर प्रकाशित झालेली ही पहिली बातमी होती. वास्तविक, ही बातमी 2 मार्च 2018 रोजी होळीच्या दिवशी ‘बुरा ना मानो होली है’च्या धर्तीवर उपहासात्मक स्वरूपात प्रसिद्ध झाली होती. ह्या बातमीचे कात्रण आता व्हायरल होत असले तरी आता त्याचा वापर ‘एप्रिल फूल’ करण्यासाठीही होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र, सत्यता पडताळणीत व्हायरल झालेली बातमी ही सहा वर्षांपूर्वी एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्ताचे कटिंग असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, आता मोबाईलधारकांनी या 18 टक्के जीएसटीच्या व्हायरल पोस्टची धास्ती न घेता आपल्या संपर्कातील सहकाऱ्यांना बिनधास्त ‘गुड मॉर्निंग’ म्हणण्यास काहीच हरकत नाही.

Advertisement
Tags :
×

.