जुलैमध्ये जीएसटी संकलन 1.82 लाख कोटी रुपये
10.3 टक्क्यांनी वाढ : अर्थव्यवस्थेला झळाळी
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
केंद्र सरकारने जुलै महिन्यातही जीएसटी संकलनातून मोठी कमाई केली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, जुलै 2024 मध्ये सकल जीएसटी संकलन 10.3 टक्क्मयांनी वाढून 1 लाख 82 हजार 075 कोटी ऊपये झाले आहे. परताव्यानंतर, जुलै 2024 साठी निव्वळ जीएसटी महसूल 1 लाख 44 हजार 897 कोटी ऊपये इतका आहे. हा महसूल मागील वषीच्या याच कालावधीच्या तुलनेत 14.4 टक्के वाढ दर्शवितो. गेल्यावषीच्या तुलनेत यावषी जीएसटी संकलनात 10 टक्क्मयांहून अधिक वाढ अपेक्षित आहे.
येत्या काही महिन्यांत सणांच्या आगमनाबरोबरच कलेक्शनमध्ये आणखी वाढ होणार असल्याचे अहवालात म्हटले आहे. एप्रिल-जुलै 2024 दरम्यान एकूण जीएसटी महसूल वार्षिक 10.2 टक्क्मयांनी वाढून 7 लाख 38 हजार 894 कोटी ऊपये झाला आहे. यामध्ये राज्यनिहाय आकडेवारी पाहिल्यास महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून राज्याने सर्वाधिक 28,970 कोटी ऊपयांचे जीएसटी संकलन केले. त्यापाठोपाठ कर्नाटक (13,025 कोटी), गुजरात (11,015 कोटी), तामिळनाडू (10,490 कोटी) आणि उत्तर प्रदेश (9,125 कोटी) यांचा क्रमांक लागतो. या संकलनाच्या आकडेवारीत वस्तूंच्या आयातीवर जीएसटीचा समावेश नाही. जून महिन्यात जीएसटी संकलन 1.74 लाख कोटी ऊपये इतके झाले होते. तर मे 2024 मध्ये सरकारचे जीएसटी संकलन 1.73 लाख कोटी ऊपये होते. गेल्यावषी मे महिन्यात हा आकडा 1.57 लाख कोटी ऊपये होता.