कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जुलैमध्ये जीएसटी संकलन 1.96 लाख कोटी रुपये

06:06 AM Aug 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

सलग सातव्या महिन्यात जीएसटी संकलन 7.5 टक्क्यांनी वाढून सुमारे 1.96 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. सरकारने जुलै महिन्यातील जीएसटी संकलनासंबंधीची आकडेवारी शुक्रवारी सायंकाळी जाहीर केली आहे. मागील वर्षी म्हणजेच जुलै 2024 मध्ये एकूण जीएसटी संकलन 1.82 लाख कोटी रुपये होते. तर गेल्या महिन्यात हे संकलन 1.84 लाख कोटी रुपये होते. सलग सातव्या महिन्यात जीएसटी संकलन 1.80 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त राहिल्यामुळे अर्थव्यवस्था भक्कम स्थितीत असल्याचे दिसत आहे.

Advertisement

सकल देशांतर्गत महसूल 6.7 टक्क्यांनी वाढून 1.43 लाख कोटी रुपये झाला, तर आयात कर 9.5 टक्क्यांनी वाढून 52,712 कोटी रुपये झाला. जीएसटी रिफंडमध्ये वार्षिक आधारावर 66.8 टक्क्यांनी वाढ होऊन ते 27,147 कोटी रुपये झाले. जुलै 2025 मध्ये निव्वळ जीएसटी महसूल 1.69 लाख कोटी रुपये होते. त्यात वार्षिक आधारावर 1.7 टक्क्यांनी वाढ दिसून आली.

30,590 कोटींसह महाराष्ट्र अव्वल स्थानी

महाराष्ट्र राज्य 30,590 कोटी रुपयांच्या संकलनासह यादीत अव्वल स्थानी आहे. कर्नाटक 13,967 कोटी रुपयांसह आणि गुजरात 11,358 कोटी रुपयांसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्रिपुरा (41 टक्के), मेघालय (26 टक्के) आणि सिक्कीममध्ये (23 टक्के) सर्वाधिक वाढ दिसून आली. मध्य प्रदेश (18 टक्के), बिहार (16 टक्के) आणि आंध्रप्रदेशमध्येही (14 टक्के)  लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेला ‘मृत अर्थव्यवस्था’ असे संबोधले असतानाही जुलै महिन्यातील जीएसटी संकलनाचे आकडे त्यांच्या दाव्याचे पूर्णपणे खंडन करतात. जीएसटी संकलनाचा आकडा वाढत असून तो भारताच्या आर्थिक ताकदीचा आणि जलद वाढीचा स्पष्ट पुरावा दर्शवतो.  भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असून काही वर्षांत भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर असल्याचे वक्तव्य सरकारच्यावतीने संसदेत करण्यात आले होते. जीएसटी संकलनाचे नवे आकडे सरकारच्या विधानाचे समर्थन करतात.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article