कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

महिंद्रा अॅण्ड महिंद्राचा ग्राहकांना जीएसटी लाभ

06:35 AM Sep 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

22 सप्टेंबरपासून मिळणार लाभ : एक्सयुव्ही3एक्सओ स्वस्त होणार

Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

ऑटो क्षेत्रातील कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा यांनी 6 सप्टेंबरपासून आपल्या सर्व आयसीइ एसयूव्ही गाड्यांवर जीएसटीमध्ये मिळणारा सवलतीचा पूर्ण लाभ ग्राहकांना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या पॅसेंजर कार्सवर 1.56 लाख रुपयांची एकंदर सवलत दिली जाणार असल्याची माहिती दिली आहे.

कंपनीने म्हटले आहे की त्यांची आयसीइ एसयूव्हीचे मूल्य 6 सप्टेंबरपासूनच कमी करण्यात आले आहे. महिंद्राने ग्राहकांसाठी फायदा होणार आहे, त्यांच्या आवडत्या एसयूव्ही गाड्या आता स्वस्त होणार आहेत. बोलेरो, नीओ या गाड्या 1.27 लाखापर्यंत स्वस्त झाल्याचे कळते. तर एक्सयुव्ही3एक्स ओ पेट्रोल व डिझेल वाहन अनुक्रमे 1.4 लाख, 1.56 लाख रुपये इतकी स्वस्त झाली आहे. थार 2 डब्ल्यूडी डिझेल व 4 डब्ल्यूडी डिझेल अनुक्रमे 1.35 लाख, 1.01 लाख रुपये स्वस्त होणार आहे. स्कॉर्पियो क्लासिक 1.01 लाख, स्कॉर्पियो एन 1.45 लाख रुपये स्वस्त होईल, असे म्हटले जात आहे. टाटा मोटर्स, टोयोटा, मारुती सुजुकी, रेनो इंडिया यांनीसुद्धा आपल्या पॉपुलर मॉडेल्समध्ये जीएसटीमध्ये सवलतीचा लाभ ग्राहकांना दिला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article